Rabi Crops: रब्बी हंगामातील सर्वात महत्त्वाच्या पिकांपैकी गहू एक प्रमुख पीक आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत कोरडवाहू भागातील गव्हाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, आता बागायती क्षेत्रात वेळेवर पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. योग्य वाणांची निवड केल्याने उत्पादनात स्थैर्य मिळते, तसेच प्रतिकारक्षम वाणांचा वापर केल्यास रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्तम उत्पादन मिळते. या दृष्टीने तज्ज्ञांनी काही उच्च उत्पादक आणि रोगप्रतिरोधक गव्हाच्या वाणांची शिफारस केली आहे..भारतातील वेळेवर पेरणीसाठी गव्हाचे वाण फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४) त्र्यंबक, तपोवन, युएएस ३०४ युएएस धारवाड, एमएसीएस ६२२२, एमएसीएस ६४७८ यावाणांची शिफारस केली जाते. यासोबत गोदावरी (एनआयडीडब्ल्यू २९५), पोषण (एचआय ८६६३), एमएसीएस ३९४९, युएएस ४१५, युएएस ४२८, युएएस, डीडीडब्लू ४८, या वाणांची ड्यूरम गहू म्हणून शिफारस केली जाते. तर खपली गव्हामध्ये डीडीके १०२५, डीडीके १०२९ आणि एमएसीएस २९७१ या वाणांची शिफारस गहू संशोधन केंद्राकडून केली जाते. .Wheat Varieties: गव्हाचे तांबेरा आणि करपा रोगासाठी प्रतिकारक वाण .महाराष्ट्रासाठीचे वाणमहाराष्ट्रात बागायती वेळेवर पेरणीसाठी NIAW-1994 (फुले समाधान), AKW-4210-6 (पिडीकेव्ही-सरदार), NIAW-301 (त्र्यंबक), MACS-6222 हे सरबती वाण व NIDW-295 (गोदावरी), MACS-4028 हे बक्षी वाण पेरणीसाठी शिफारस केले जातात. गहू संशोधन केंद्राने या वाणांची शिफारस केलेली आहे. .फुले समाधान (एनआयएडब्ल्यू १९९४)महाराष्ट्रातील बागायतीत वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी एकमेव शिफारसितवाण आहे. जास्त उत्पादन देणारा, शेतक-यांमध्ये लोकप्रिय असलेला वाण हा वाण आहे. वेळेवर बागायतीत पेरणीसाठी प्रती एकरी ४० कि.ग्रॅ. बियाणांची शिफारस केली आहे. या पिकाचा कालावधी ११५-१२० दिवसांचा असतो. तर उत्पादकता ४५ ते ५० क्विंटल प्रती एकर इतकी आहे. या वाणाचे दाणे टपोरे व आकर्षक असतात. तसेच ते चपातीसाठी उत्तम वाण आहे. हा वाण मावा किडीस आणि तांबेरा रोगास उच्च प्रतिकारक्षम आहे. शिवाय याच्यामध्ये १२ टक्के पेक्षा अधिक प्रथिने असतात..तपोवन (एनआयएडब्ल्यू ९१७)तपोवन हे बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण आहे. याचे दाणे मध्यम असतात परंतु ओंब्यांची संख्या जास्त असते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के इतके असते. तसेच हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक असून ते चपातीसाठीसुद्धा उत्तम वाण आहे. या वाणाचे पीक ११५ दिवसांत कापणीस तयार होते. तर या पिकाची उत्पादन क्षमता ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर इतकी असते..त्र्यंबक (एनअयएडब्ल्यू ३०१) :-त्र्यंबक हे सुद्धा बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण आहे. या वाणाचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात. शिवाय यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक आढळते. हा वाण तांबेरा रोगासाठी प्रतिकारक असून चपातीसाठी उत्तम वाण आहे. हे पीक ११५ दिवसांत कापणीसाठी तयार होते आणि याची उत्पादन क्षमता ४० ते ४५ क्विंटल प्रतिहेक्टर इतकी असते..गोदावरी (एनआयडीडब्ल्यू : २९५) बागायत वेळेवर पेरणीसाठी गव्हाचे हा उत्तम बक्षी वाण आहे. या वाणाचे दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक असून प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक असते. हा वाणही तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. रवा, शेवया, कुरडई यासाठी हा उत्तम वाण आहे. या पिकाचा कालावधी ११० ते ११५ दिवसांत पूर्ण होतो. तसेच याची उत्पादन क्षमता ४५ ते ५० क्विंटल प्रतिहेक्टर एवढी असते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.