Washim News: युरिया तुटवड्यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची व्यथांची दखल घेऊन शासनाने ३९०० टन युरिया साठा उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ‘अॅग्रोवन’ने मंगळवारी (ता. २) याबाबत वृत्त प्रकाशित करून वस्तुस्थिती मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर, युरियासमस्येची दखल घेत शासकीय स्तरावर युरिया उपलब्ध करून देण्यात आला. खताची चिंता मिटल्यामुळे शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’चे आभार मानले आहेत..गेले काही दिवस युरियाच्या टंचाईमुळे जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले होते. यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शासनाने युरियाचा साठा उपलब्ध करून दिला आहे. गहू पिकाच्या पेरणीमुळे वाढलेली युरियाची मागणी आणि संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे..Urea Shortage: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केंद्र सरकारचा दावा फोल.खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ११) जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा नियंत्रण समितीच्या बैठकीत याचा आढावाही घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, कृषी विकास अधिकारी तथा सदस्य सचिव अभिजित देवगिरकर, पोलीस उपअधीक्षक डी. एस. सोनुने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श्री. साळुंखे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक स्वप्निल ठाकरे, नितीन पाटणी, सुनील पाटील, निशांत पुसदेकर, करण जयस्वाल व इतर उपस्थित होते..Urea Fertilizer Linking: खतांच्या लिंकिंगचा शेतकऱ्यांना भुर्दंड! २६६ रुपयांचं युरियाचं पोतं १,६५० रुपयांना; कैलास पाटील काय म्हणाले?.बैठकीत जिल्ह्यातील युरिया उपलब्धतेचा आढावा घेताना श्री. देवगिरकर यांनी माहिती दिली की, गुरुवारी (ता. ११) आरसीएफची रॅक दाखल झाली असून त्याद्वारे २३०० मेट्रिक टन युरिया मिळाला. तसेच शुक्रवारी (ता. १२) कोरोमंडल कंपनीची रॅक उपलब्ध होत असून १६०० मेट्रिक टन युरिया मिळणार आहे. असा एकूण जिल्ह्यात ३९०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार आहे. .युरियाचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून पुरवठा नियमित राहील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. कुठल्या कृषी सेवा केंद्रावर किती साठा उपलब्ध आहे, याची माहिती मिळावी म्हणून कृषी विभागाने एक विशेष ब्लॉगस्पॉट सुरू केला आहे. याबाबत https://adowashim.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html यावर सविस्तर माहिती मिळू शकेल..खत विक्रीसंबंधी कठोर निर्देशखत विक्री फक्त IFMS E-POS प्रणालीद्वारेच करावी. खतांसोबत अनावश्यक साहित्याची जोड विक्री केली जाऊ नये. नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.