Solapur News: भारत निवडणूक आयोगाकडे १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीतून संभाव्य दुबार मतदारांचा शोध राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. जिल्ह्यात ३८ हजार ९०९ एवढे दुबार मतदार आहेत. .या मतदारांच्या घरी महसूलची यंत्रणा पोहोचण्यास सुरवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३ हजार संभाव्य दुबार मतदारांकडून हमीपत्र घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीला एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याबाबतचे हे हमीपत्र आहे..Bihar Election 2025: बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील १२२ जागांसाठी मतदान सुरु, 'हे' मतदार ठरणार निर्णायक .जिल्ह्यात असलेल्या संभाव्य दुबार मतदारांच्या घरी महसूलची गाव व तालुका पातळीवरील यंत्रणा पोहोचू लागली आहे. राज्य निवडणूक आयोगाने व्हिसीद्वारे याबाबतचा नुकताच आढावा घेतला आहे..Local Body Elections: मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेच काम पुढे ढकला ; केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र.येत्या तीन दिवसांत ही मोहीम संपविण्याची सूचना गाव पातळीवरील महसूल यंत्रणेला देण्यात आली आहे. दुबार मतदारांच्या मुद्यांवर राज्यात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महामोर्चा काढला होता. जिल्हा पातळीवरही दुबार मतदारांचा मुद्दा चर्चेत आला होता. दुबार मतदारांना रोखण्यासाठी संभाव्य मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करणे आणि दुबार असल्याची खात्री पटल्यानंतर त्याच्याकडून हमीपत्र घेतले जात आहे..जिल्ह्यात ५० टक्क्यांच्या आत आरक्षणजिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी ५० टक्क्यांच्या आत आरक्षण देण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीही आरक्षण देताना ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरात सुरू असलेला ५० टक्क्यांवरील आरक्षणाचा मुद्दा सोलापूर जिल्ह्याला लागू पडत नसल्याचे प्रशासकीय पातळीवरून सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.