Nagpur News: मागील वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत पूर्व विदर्भातील तब्बल ३७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. याच भागात मागील २५ वर्षांत ६३८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले आहे. .यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२५ मध्ये सर्वाधिक ५१ आत्महत्यांची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल ऑक्टोबरमध्ये २८ आत्महत्या झाल्या. जिल्हानिहाय आत्महत्यांचा विचार करता, एकट्या वर्धा जिल्ह्यात मागील वर्षात १७४,.Farmer Deaths: यवतमाळ जिल्ह्यात ३३४ दिवसांत ३४२ आत्महत्या.तर चंद्रपूर जिल्ह्यात १३२ आत्महत्या झाल्या आहेत. असे असूनही शासन योजनांचा लाभ मात्र कोणत्याच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळाला नाही. शासकीय निकषांच्या जाळ्यात अडकून अनेक कुटुंबे मदतीपासून वंचित राहिली आहेत..३७४ आत्महत्यांपैकी २२३ कुटुंबेच शासनाच्या मदतीस पात्र ठरली, तर १३१ शेतकरी आत्महत्या ‘कागदोपत्री’ सिद्ध न झाल्याने अपात्र ठरविण्यात आली असून २० प्रकरणांवरील निर्णय चौकशीमुळे प्रलंबित आहेत. दहा महिन्यांत पात्र ठरलेल्या कुटुंबांना प्रति प्रकरण १ लाख रुपये.Farmers Deaths: भीषण वास्तव! कर्नाटकात अडीच वर्षांत २,८०० शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, हावेरी, बेळगावात सर्वाधिक.याप्रमाणे एकूण १ कोटी ८१ लाख रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यात आला. मात्र ही मदत जखमेवरचा तात्पुरता मलम ठरतो आहे; इलाज नाही, अशी खंत शेतकरी नेते मनीष जाधव यांनी व्यक्त केली..‘‘हा आकडा केवळ एका वर्षाचा असला, तरी तो दशकानुदशके साचलेल्या संकटांचे भयावह वास्तव उघड करतो. कर्जफेडीचा तगादा, वाढता उत्पादनखर्च, हमीभावाचा अभाव, नापिकी, विमा व नुकसानभरपाईतील दिरंगाई यामुळे शेतकरी अक्षरशः कोंडीत सापडला आहे. योजनांची घोषणाबाजी सुरू असली, तरी शिवारात त्यांचा ठोस परिणाम दिसून येत नाही. यातूनच आत्महत्या वाढल्या आहेत,’’ असे मत जाधव यांनी व्यक्त केले..२५ वर्षांचा आत्महत्यांचा आलेखवर्ष आत्महत्या२००१-२० ४,६०८२०२१ ३८०२०२२ ३६५२०२३ ३३१२०२४ ३२३ऑक्टोबर २०२५ पर्यंत ३७४.दरवर्षी सव्वातीनशेच्या वर असा शेतकरी आत्महत्यांचा आकडा स्थिर आहे. शासनाकडून योजनांच्या स्वरूपात केवळ मलमपट्टी केली जात आहे; ठोस, दीर्घकालीन उपाय कुठेच दिसत नाहीत, हे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.अभय कोलारकर, माहिती अधिकार कार्यकर्ते, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.