Yavatmal News: ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते...मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...’ या ओळीतून कवी सुरेश भट यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. मरणानंतरही शेतकऱ्यांची वेदना कमी झालेली नाही. आत्महत्या पात्र की अपात्र, अशा निकषात ते अडकलेल्या आहेत. २०२५ या वर्षांत गेल्या ३३४ दिवसांमध्ये तब्बल ३४२ शेतकरी आत्महत्या झाल्या असून दिवसाला एक आत्महत्या झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते..२००१ पासून अनेक सरकारे आली आणि गेली. शेतकरी आत्महत्येचे केवळ राजकारण झाले. केंद्र व राज्य शासन स्तरावरून शेतकरी आत्महत्येचे सुरुवातीच्या काळात प्रयत्न झाले. परंतु त्यानंतर देखील शेतकरी आत्महत्या थांबल्या नसल्याचे विदारक चित्र आहे. शेतकरी आणि संकट हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून कायम आहे. यंदा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्ण वाया गेला..Farmers Deaths: भीषण वास्तव! कर्नाटकात अडीच वर्षांत २,८०० शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, हावेरी, बेळगावात सर्वाधिक.अतिवृष्टीने तब्बल सहा लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली. पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जमिनी खरडून गेल्या. संततधार पावसाने पिके पिवळी पडली. यानंतर कीड-रोगाने उरलेले पीक गेले. या सर्व संकटातून उरलेले पीक घरात येईल, अशी आशा असतानाच परतीच्या व अवकाळी पावसाने पुन्हा नुकसान केले. या सर्व बाबीचा परिणाम उत्पन्नावर झाला. यानंतरही हाती आलेल्या पिकांना भाव नसल्याने लागवडीचा खर्चही यंदा निघाला नाही. गेल्या वर्षभरातील संकटांचा सामना करता करता काही शेतकऱ्यांची हिंमत हारली..त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. गेल्या वर्षभरातील आत्महत्येचा आकडा पाहता ही संख्या भयावह आहे. नापिकी, बोगस बियाणे, कीटकनाशके, पीककर्ज, हमीभाव, सावकारी कर्ज आदी कारणातून शेतकरी मेटाकुटीला आला. त्यातूनच शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले. यंदा अतिवृष्टीने पीक खरडून गेले असून पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे..Farmer Death: दहा महिन्यांत राज्यात ८८८ शेतकरी आत्महत्या.या संकटातून शेतकरी अजूनही सावरले नसून हतबल झालेला शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. या वर्षी अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले. ७० टक्क्यांपेक्षा अधिक पीक पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे मातीमोल झाले. २०२५ मधील ३३४ दिवसांत ३४२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे..गेल्या ११ महिन्यांतील शेतकरी आत्महत्यामहिना - शेतकरी आत्महत्याजानेवारी-२८फेब्रुवारी-२०मार्च-३१एप्रिल-२५मे-३५जून-२४जुलै-२७ऑगस्ट-४३सप्टेंबर-३४ऑक्टोबर-४१नोव्हेंबर-३४.ऑगस्टनंतर वाढल्या आत्महत्या२०२५ च्या सुरुवातीपासूनच शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. अतिवृष्टी, पूरस्थितीनंतर यात वाढ झाल्याचे दिसत आहे. यंदा जुलैपासूनच अतिवृष्टी होती. यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने गेल्या चार महिन्यांत शेतकरी आत्महत्येची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. या काळात झालेल्या उपाययोजनाही तोकड्या ठरल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.