Solapur Agri News : सोलापूर प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप २०२६ हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ११ ऑगस्टच्या सद्यःस्थिती अहवालानुसार जिल्ह्यात कर्जदार व बिगर कर्जदार मिळून एकूण ३ लाख ३२ हजार ६७० शेतकऱ्यांनी पीकविमा नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या ३,३३,२७६ शेतकऱयांनी विमा उतरवला होता. त्या तुलनेत यंदाची नोंदणी केवळ ६०६ ने कमी असून, जिल्हा पुन्हा एकदा गतवर्षाच्या कामगिरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे..शासनाने दिलेल्या मुदतवाढीचा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. ९ जुलैपर्यंत जिल्ह्यात २ लाख ८७ हजार ५२२ शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. मुदतवाढीनंतरच्या काळात सुमारे ४५ हजार ५६७ नवीन शेतकरी या योजनेत सहभागी झाले, ज्यामुळे एकूण नोंदणीत लक्षणीय वाढ झाली..Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा योजनेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री भरणे : वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन.जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत शेतकरी ३,३२,६७० आहेत. तर बिगर कर्जदार शेतकरी ३,२७,८७५ आणि कर्जदार ४,७९५ शेतकऱी आहेत. यंदा २,४१,८०६.२८ हेक्टर इतके क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. .Crop Insurance Registration: शेवटच्या मुदतीत पीकविम्यासाठी धावपळ.यंदा बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला असून, एकूण ३.२७ लाखांहून अधिक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण केले आहे. या नोंदणीमुळे जिल्ह्यातील २ लाख ४१ हजार ८०६ हेक्टरहून अधिक शेती क्षेत्र विम्याखाली आले आहे..पीकविमा नोंदणीची स्थितीएकूण विमाधारक शेतकरी : ३ लाख ३२ हजार ६७०बिगर कर्जदार शेतकरी : ३ लाख २७ हजार ८७५कर्जदार शेतकरी : ४ हजार ७९५विम्याखालील क्षेत्र : २ लाख ४१ हजार ८०६.२८ हेक्टरगतवर्षीची नोंदणी : ३ लाख ३३ हजार २७६ शेतकरीयंदा गतवर्षापेक्षा कमी : ६०६ शेतकरी९ जुलैपर्यंत नोंदणी : २ लाख ८७ हजार ५२२मुदतवाढीनंतर सहभागी झालेले शेतकरी : सुमारे ४५ हजार ५६७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.