Satara News : शाहूनगर, विलासपूर भागांतील नागरिकांना अखंडित आणि जास्तीचा पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजना उभारण्यात येत आहे. योजनेसाठी ३२ कोटींचा खर्च येणार असून, पुढील ३० वर्षांत वाढणारी लोकसंख्या ग्राह्य धरत ही योजना उभारण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून, योजनेचे काम सध्या ६० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. .जुन्या योजनेमुळे होणाऱ्या जलकोंडीपासून नवीन योजनेद्वारे शाहूनगर आणि विलासपूरच्या नागरिकांची सुटका होणार आहे. हद्दवाढीनंतर शाहूनगर व इतर उपनगरे, तसेच विलासपूरचा परिसर पालिका हद्दीत आला आहे. .Tanker Water Supply : ‘दक्षिण’मध्ये पाच, अक्कलकोटमध्ये एक टँकर.या भागास प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठीची पाणीपुरवठा योजना जुनी झाल्याने त्यात वारंवार तांत्रिक बिघाड होण्याच्या प्रमाणात झाली होती. वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता..दोघांच्या प्रयत्नांना यशया भागातील पाणीपुरवठ्यातील अडचणी ओळखून खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या योजनेसाठीचा पाठपुरावा शासनाकडे सुरू केला होता. प्राधिकरणाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यास दोन्ही लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी तसेच ३२ कोटींचा निधी मिळाला..नवीन वाहिन्यांचे जाळेपुढील ३० वर्षांत वाढणारी लोकसंख्या ग्राह्य धरत योजना तयार करण्यात येत असून, शाहूनगर आणि विलासपूरअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या वितरण टाक्यांना जोडण्यासाठी सुमारे ३५ किलोमीटर अंतरात नवीन वाहिन्यांचे जाळे उभारण्यात येणार आहे..Marathwada Water Supply : नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष टळणार .कासबाबतचा पत्रव्यवहारकास योजनेतील अतिरिक्त पाणी आपत्कालीन परिस्थितीत शाहूनगरवासीयांना देण्यासाठीचा प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठीचे पत्र पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्राधिकरणास दिले आहे. त्यात नवीन योजनेच्या साठवण टाकीस कास योजनेची वाहिनी जोडण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे..अशी आहे नवीन योजनाउपशासाठी कृष्णा नदीजवळ नवीन जॅकवेलइंटेक वेलदेखील उभारणारदाब नलिका, गुरुत्व नलिकांचे३५ किलोमीटरचे जाळेविसावा नाका येथे जलशुद्धीकरण केंद्रशाहूनगर, विलासपूर येथे नवीन साठवण टाकी.योजनेच्या चार भिंती व विलासपूर येथील टाकीचे काम पूर्ण झाले आहे. मंगळाईदेवी मंदिराशेजारील टाकीचे काम सुरू असून, डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात पाणी वितरण सुरू करण्याचा प्रयत्न आहे. वाहिन्यांचे काम देखील पूर्ण होत आले असून, कृष्णा नदीतून उपसा करण्यासाठी जॅकवेल आणि इंटेक वेलचे काम पूर्णत्वास येत आहे.- विजयकुमार देशमुख, शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण सातारा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.