Hyderabad News: प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याने तेलंगणमध्ये गेल्या वर्षभरात ३०५ कारखाने बंद करण्यात आले. तेलंगण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (टीजीपीसीबी) ही माहिती दिली. सात जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने ३०५ कारखाने बंद करण्यात आल्याचे मंडळाने सांगितले. .नियम न पाळणाऱ्या अन्य काही कंपन्यांनाही नोटीस पाठविण्यात आली आहे. राज्यात लाल, नारंगी, हिरवा आणि पांढरा या श्रेणीत सुमारे १२ हजार २६४ कारखाने आहेत. प्रदूषण नियंत्रणाअंतर्गत दोन हजार ६९ कारखान्यांमध्ये प्रदूषण पसविणाऱ्या घटकांची तपासणी करण्यात आली..Sugar Industry Roadmap: साखर उद्योगाच्या ‘रोडमॅप’चा केंद्र सरकारकडून अभ्यास सुरू.नियमांचे उल्लंघन केलेल्या एक हजार २३४ कारखान्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तपासणीत ६९७ कारखाने नियमांचे पालन करीत असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावरील बंदी आदेश मागे रद्द करण्यात आला आहे..Processing Industry Issue: बँकांच्या असहकार्यामुळे प्रक्रिया उद्योग रखडले.ऑनलाइन देखरेख कक्षउद्योगातून होणारे उत्सर्जन आणि प्रदूषकांवर लक्ष ठेवण्यासाठी ऑनलाइन देखरेख कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आठवड्यातील २४ तास हा कक्ष सुरू राहणार असून सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या ५०१ कारखान्यांतून होणारे उत्सर्जन आणि प्रदूषण करणाऱ्या घटकांवर ऑनलाइन देखरेख प्रणालीमार्फत लक्ष ठेवले जात आहे..प्रदूषण रोखण्यासाठी...जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत उत्सर्जन, प्रदूषण मानकांचे उल्लंघन केल्याने कृती दलाने १०८ कारखान्यांची तपासणीप्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध तक्रारीवर त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी ‘टीजीपीसीबी’ने टोल फ्री क्रमांक जाहीर ऑनलाइन तक्रार नोंदविण्यासाठी ‘जनवाणी -प्रदूषण नियंत्रण’ या ॲपची निर्मिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.