Pune News: केंद्र सरकारने अखेर पिवळ्या वाटाण्याची शुल्कमुक्त आयात बंद करून ३० टक्के शुल्क लागू केले. परंतु पिवळ्या वाटाण्याचे भाव तीन महिन्यांतच २३ टक्क्यांनी कमी झाल्याने आयात मालाचे भाव कमीच राहतील. शेतकऱ्यांना चांगला भाव द्यायचा असेल, तर आयात शुल्क किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे, असे आयातदार व उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले..केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये पिवळा वाटाण्यावरील आयात शुल्क काढले होते. त्यानंतर मुदतवाढ देत ३१ मार्च २०२६ पर्यंत मुक्त आयातीला परवानगी देण्यात आली होती. पण पिवळा वाटाण्यामुळे देशात कडधान्याचे भाव पडले. कारण पिवळा वाटाणा सर्वच डाळींना कमी अधिक प्रमाणात पर्याय म्हणून वापरला जातो. त्यातही तूर आणि हरभऱ्याच्या भावावर जास्त परिणाम होतो..Yellow Peas Import: 'पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त आयातीचा भारतीय शेतकऱ्यांना फटका'; सुप्रीम कोर्टानं केंद्राकडं उत्तर मागितलं.तुरीचे भाव सध्या हमीभावापेक्षा १८ टक्क्यांनी कमी आहेत. उडदाचे भाव हमीभावापेक्षा १६ टक्क्यांनी, तर मुगाचे भाव हमीभावापेक्षा २३ टक्क्यांनी कमी आहेत. हरभऱ्याचे भावही हमीभावापेक्षा १ हजाराने कमी आहेत. विशेष म्हणजे सध्या बाजारात तूर आणि हरभऱ्याची आवक खपूच कमी आहे. असे असतानाही आयात खुली असल्याने दर दबावात आले आहेत..पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शुल्कमुक्त आयात बंद करून ५० टक्के आयात शुल्क लावावे, अशी मागणी शेतकरी आणि उद्योगांनीही केली होती. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतेच तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओडिशात तूर, मूग आणि उडीद हमीभावाने खरेदीला मान्यता दिली. त्यानंतर सरकारने बुधवारी (ता.२९) पिवळा वाटाणा आयातीवर १० टक्के शुल्क आणि २० टक्के कृषी पायाभूत सुविधा सेस असे एकूण ३० टक्के आयात शुल्क लावले आहे. १ नोव्हेंबरपासून हे शुल्क लागू होणार आहे..Yellow Peas Import: पिवळ्या वाटाण्याच्या आयातीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान; कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान.“सरकारने मुक्त आयात बंद करून ३० टक्के शुल्क लावले, हे सकारात्मक पाऊल आहे. पण सरकारने आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवणे गरजेचे आहे. तशी मागणी आम्ही यापूर्वी सरकारकडे केली होती. पिवळ्या वाटाण्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच कमी झाले आहेत. त्यामुळे ३० टक्के आयात शुल्क लावूनही आयात स्वस्तच पडणार आहे,” असे इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशनचे अध्यक्ष बिमल कोठारी यांनी सांगितले..आंतरराष्ट्रीय बाजारात नरमाईभारताने कडधान्य आयात खुली केल्यानंतर कडधान्य उत्पादक देशांमध्ये उत्पादन वाढले आहे. त्यामुळे भावही कमी झाले. ग्लोबल पल्सेस काॅन्फेडरेशनच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात मागील तीन महिन्यांत सर्वच कडधान्यांचे भाव कमी झाले. तुरीचा भाव ऑगस्टमधील प्रति टन ६०० डाॅलर्सवरून ५५० डाॅलर्सपर्यंत कमी झाला. तर हरभऱ्याचा भाव २७ टक्क्यांनी कमी होऊन ५०० डाॅलर्सपर्यंत घसरला. मसूरचा भाव ७८५ डाॅलर्सवरून ६१० डाॅलर्सपर्यंत उतरला. पिवळ्या वाटाण्याचे भाव २७ टक्क्यांनी कमी होऊन ३०० डाॅलर्सपर्यंत आले आहेत..सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. पण ३० टक्के शुल्क लावल्यानंतरही आयात वाटाणा ३६ रुपये किलोने मिळेल. देशात हरभऱ्यासह इतर कडधान्यांचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवणे आवश्यक आहे. तशी मागणी सरकारकडे करणार आहे. बिमल कोठारी, अध्यक्ष, इंडिया पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.