Jalgaon News: खानदेशात शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त यंदा लवकर होईल, असे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. यात यंदा शासकीय खरेदी मार्चमध्येच सुरू करावी, अशी मागणी आहे. मागील वर्षी हरभरा खरेदी मे महिन्यात सुरू झाली होती. .हरभरा, बाजरी, मका आदींची खरेदी एकाच वेळी खानदेशात सुरू होईल, असे संकेत आहेत. परंतु अद्याप या खरेदीसाठी नोंदणी किंवा अन्य कार्यवाही सुरू झालेली नाही. ही कार्यवाही लवकर सुरू करण्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे. खरेदी खानदेशात ३० केंद्रांत होईल, अशीही माहिती आहे. जळगावात जिल्ह्यात कोरडवाहू हरभरा मळणी सुरू झाली आहे. मळणीनंतर आवक वाढते व दर कमी होता. यामुळे हमीभावात हरभरा विक्री करण्यासाठी शेतकरी नियोजन करीत असून, त्यासंबंधी लवकर खरेदी सुरू करण्याची मागणी होत आहे..Chana Procurement: शासकीय हरभरा खरेदीचा मुहूर्त लवकर करण्याची मागणी.जळगाव जिल्ह्यात हरभरा विक्रीसाठी मोठा प्रतिसाद मिळतो. धुळ्यातही चांगला प्रतिसाद हरभरा खरेदीस मिळतो. पण सध्या हरभरा विक्रीसाठी नोंदणी सुरू झालेली नाही. बाजारात हरभऱ्याचे दर मागील वेळेस काही दिवस हमीभावाच्या जवळपास होते. परंतु सध्या दरांबाबत कुठलाही अंदाज नाही. .MSP Chana Procurement : हमीभावाने हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता निश्चित.हरभरा पेरणी खानदेशात स्थिर आहे. परंतु आवक एकाच वेळी सुरू होईल व दर कमी होतील, अशी स्थिती आहे. यामुळे शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसंबंधी नोंदणीची प्रक्रिया केव्हा सुरू होईल, अशी प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. शासकीय दर कमी आहेत. कारण उत्पादन खर्च वाढत आहे..दुसरीकडे मोठ्या काबुलीची पेरणीही खानदेशात २५ ते ३० हजार हेक्टरवर झाली आहे. त्याची खरेदीदेखील सुरू करण्याची मागणी केली जात आहे. कारण या हरभऱ्याची शासकीय खरेदी केली जात नाही. त्याच्या दरांबाबत मनमानी प्रकार खरेदीदार बाजारात करतात, असाही आरोप शेतकरी करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.