Kolhapur News: ‘एफआरपी’वर ऊस शेती परवडत नाही. गतवर्षी साखरेसह उपपदार्थांना उच्चांकी भाव मिळूनदेखील कारखाने शेतकऱ्यांना जादाचा नफा द्यायला तयार नाहीत. अशा स्थितीत या वर्षीच्या उसाचा दर आणि आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी रविवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजता शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आठवी ‘एल्गार परिषद’ होणार असल्याची माहिती, आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी सोमवारी (ता. २०) जयसिंगपूर येथे पत्रकार परिषदेत दिली. .श्री. चुडमुंगे म्हणाले, ‘‘शिरोळ तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये याप्रश्नी जागर बैठका घेतल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची मते जाणून घेतली असता शेतकऱ्यांना चळवळीबरोबर राहून उसाला योग्य भाव पदरात पाडून घ्यायचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारखानदार शेतकऱ्यांना जादाचा लाभ द्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या वर्षी उसाची टंचाई असल्याने आंदोलन न करता कारखान्यांनी दर देण्याची गरज होती..Sugarcane FRP: उसाला विनाकपात ३७५१ रुपये उचल मिळावी : राजू शेट्टी.यासाठी जवळपास दोन महिने आधी मोटरसायकल रॅलीने जाऊन निवेदन दिले आहे. मात्र कारखानदार चर्चेला पुढे यायला तयार नाहीत. काटामारी करून मिळवलेल्या काळ्या पैशांतून राजकारण करायचे आणि हाच पैसा जनतेत वाटायचा हे सुद्धा आता लोकांच्या लक्षात आले आहे. साखर, बगॅसचे दर चार हजारांवर तर मळी १६ हजार रुपयांवर विक्री झाली आहे..Sugarcane Price Hike: हरियाना सरकारकडून ऊस दरात १५० रुपये वाढ.एकूण टनाला ६५०० रुपयांचे उत्पन्न गृहीत धरले ९०० रुपये तोडणी, वाहतुकीचा खर्च, १६०० ते १७०० रुपये प्रक्रिया व व्यवस्थापन खर्च वजा करता शेतकऱ्यांना ३२०० रुपये प्रतिटन दर देण्यात आला आहे.’’ आमच्या हिशेबाप्रमाणे अद्याप कारखान्यांकडे सातशे ते आठशे रुपये शिल्लक आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. यासाठीच शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन रविवारच्या ‘एल्गार परिषदेत’ ऊस दर आणि आंदोलनाच्या दिशा स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले..या वेळी दीपक पाटील, पोपट संकपाळ, राकेश जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, बाळकृष्ण भोगावे, संभाजी शिंदे, बाळगोंडा पाटील, संजय मगदूम, भूषण गंगावणे, सिकंदर सनदी, पंकज मगदूम, धनाजी माने, संजय चौगुले, मंगेश नलवडे, संदीप चौगुले, शितल चौगुले, उदय होगले उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.