Kolhapur News: कागल तालुक्यात सुमारे १०० ऊस रोपे बनविणाऱ्या रोपवाटिका आहेत. सतत झालेल्या पावसाने या रोपवाटिकांमध्ये २५ लाख रोपे खराब झाली आहेत. ही रोपे वापराविना पडून आहेत. तयार रोपे विक्री न झाल्यामुळे रोपवाटिकाधारकांचे सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अवकाळी आणि लांबलेल्या पावसाचा फटका ऊस रोपवाटिकाधारकांना बसला आहे..११ मेपासून सुरू झालेला पाऊस थांबायला तयारच नव्हता. सततच्या पावसामुळे ऊस लागणी खोळंबल्या. ऊस लागणीसाठी जमिनीला ‘घात’ नसल्याने शेतकऱ्यांना लागणीसाठी सरी सोडता आली नाही. काही शेतकऱ्यांनी उसासाठी सरी सोडली. मात्र, सततच्या पावसाने उसाच्या सरीत पाणी तुंबल्याने लागण करता आली नाही. तर काही शेतकऱ्यांनी लागण केलेल्या सरीतील पाण्याचा निचरा न झाल्याने उसाचे डोळे कुजले..Sugarcane Nursery : ऊस रोपवाटिकांना कर्नाटकचा आधार.सप्टेंबरच्या दरम्यान आडसाली लागणी मोठ्या प्रमाणात होतात, या उद्देशाने रोपवाटिकाधारकांनी मोठ्या प्रमाणात ऊस रोपे तयार केली. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे रोपांची उचल झाली नाही. पाऊस उघडेल आणि रोपांची उचल होईल, या अंदाजाने ते रोपे तयार करत गेले. ५५ दिवसांपुढील ऊस रोपे लागणीस योग्य नसल्याच्या कारणाने ही रोपे पडून राहिली. या रोपांची विक्री न झाल्याने रोपवाटिकाधारकांना तोटा सहन करावा लागलाच नाही. ट्रेमध्ये उसाचा डोळा भरल्यानंतर २५ ते ३५ दिवसांत तो लागण करण्यास योग्य होतो. दोन महिन्यांचा कालावधी उलटला तर तो डोळा लागण करण्यास योग्य ठरत नाही. परिणामी ऊस रोपवाटिकामालकांचे नुकसान होते. यावर्षी ११ मे रोजी सुरू झालेला अवकाळी पाऊस थांबला.Sugarcane Nursery : ‘सुपरकेन नर्सरी’ने वाचते १० लाख लिटर पाणी.मागणीअभावी नुकसान... सर्वसाधारणपणे उसाचे एक रोप तयार करण्यासाठी एक रुपया ते एक रुपये दहा पैसे खर्च येतो. एका ट्रेमध्ये सुमारे ७० डोळे असतात. पैकी ४५ ते ५० डोळेच तजेलदार आणि विक्रीस उपयुक्त होतात. एक रोप सध्या १ रुपये ७५ पैसे ते १ रुपये ८० पैसे दराने विकले जाते. सर्वसाधारणपणे ८६०३२ या उसाच्या डोळ्याला मागणी असते; परंतु यावर्षी पावसाने मागणीच नसल्याने नुकसानग्रस्त रोपवाटिकाधारकांतून नुकसानभरपाईची मागणी होत आहे..यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ऊस रोपवाटिकाधारकांचे कंबरडेच मोडले आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात रोपांची मागणी असते. या पार्श्वभूमीवर तयार केलेली रोपे फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील रोपवाटिकाधारकांचे सुमारे ५५ ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रदीप कोरे, शेंडूर, ऊस रोपवाटिकामालक .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.