Parbhani News: परभणी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीतून मंगळवारी (ता. २७) उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ५४ गटांमध्ये २४७ उमेदवार आणि पंचायत समित्यांच्या १०८ गणांसाठी ४३३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत..जिल्हा परिषदेच्या ५४ गटांसाठी ५८६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीत ४४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. एकूण १६२ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर २४७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. .Local Body Election: पैसे घेऊन मतदान करणार नाही.Local Body Electionsत्यात स्त्री १३६ आणि पुरुष १११ उमेदवार आहेत. तर परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ९ पंचायत समित्यांच्या १०८ गणांसाठी ९४४ अर्ज दाखल केले होते. .Local Body Elections: साताऱ्यात छाननीमध्ये ८५ अर्ज अवैध .छाननीत ७६९ अर्ज वैध ठरले. ३१२ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे ४३३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात स्त्री २१४ आणि पुरुष २१९ उमेदवार आहेत. .भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अप), शिवसेना (शिंदे) आदी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.