Solapur News: मोहोळ तालुक्यात रब्बी हंगामातील विविध पिके पेरणीस प्रारंभ झाला आहे. ज्वारी, मका, गहू आदींची एकूण १० हजार ५५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी व लागवड झाली आहे. मात्र, ज्वारीची पेरणी केवळ २४ टक्के झाली आहे. त्यामुळे यंदा ज्वारीची भाकर महागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. .चालू पावसाळ्यात मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तर सीना नदीलाही मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. त्यामुळे जमिनीचा पोत खराब झाला आहे. अद्यापही काही ठिकाणी वाफसा नाही, तर जमिनीतून आजही पाणी वाहत आहे. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. जमिनीची मशागतही करता येईना तर वाफशाअभावी रब्बी हंगाम पुढे चालला आहे. .Jowar Sowing : ज्वारीची १४.२४ लाख हेक्टरवर राज्यात पेरणी.पावसाळ्यापासून ते गेल्या आठवड्यापर्यंत ढगाळ हवामान होते; मात्र गेल्या आठवड्यापासून कडक थंडी पडू लागली आहे. ही थंडी गहू, हरभरा, कांदा या पिकांना अत्यंत पोषक आहे. सध्या कांद्याची लागवड व पेरणीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, गव्हाची पेरणी अत्यंत कमी झाली आहे. बाजारात सध्या ज्वारीचा दर गव्हाच्या बरोबरीने आहे. ग्रामीण व शहरी भागात ज्वारीची भाकरी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. .Rabi Season: नांदेड जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग; २५ हजार हेक्टर पेरा.त्यासाठी उशीर का होईना, या अनुषंगाने ज्वारीची पेरणी सुरू आहे. शेवटी चारा म्हणून कडबा का पदरात पडेना, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे दुभत्या जनावरांना चाऱ्यासाठी मकेची पेरणी व लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या सकाळी धुके पडू लागले आहे..तालुक्यातील पेरणीची सद्य:स्थितीज्वारी : सरासरी क्षेत्र २४ हजार ९८६ हेक्टर, पेरणी ६ हजार ९ हेक्टर, सरासरी २४ टक्के, मका : सरासरी क्षेत्र ३ हजार ९४६ हेक्टर, पेरणी २ हजार ७२५ हेक्टर, सरासरी ६९.६ टक्के, गहू : सरासरी क्षेत्र ३ हजार ३९० हेक्टर, पेरणी ११६ हेक्टर, सरासरी ३.४२ टक्के, हरभरा : सरासरी क्षेत्र ३ हजार ९४४ हेक्टर, पेरणी ५३३ हेक्टर, सरासरी १३.५१ टक्के, कांदा : लागवड व पेरणी १ हजार १७२ हेक्टर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.