Maharashtra Heavy Rainfall: राज्यातील १६ जिल्ह्यांतील २३० मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बीड जिल्ह्याच्या पातोडा तालुक्यातील थेरला मंडळात सर्वाधिक १५८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नगर, सोलापूर, बीड, धाराशीव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. .कुठे कुठे झाली अतिवृष्टी?पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील मल्यान, नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण, कालवडी, डोंगराळे, कळवण तालुक्यातील दळवट, नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव, जातेगाव, नायडोंगरी, सुरगणा तालुक्यातील बाऱ्हे, बोरगाव, मानखेड, दिंडोरी तालुक्यातील नाणशी, पेठ तालुक्यातील पेठ, जोगमोडी, कोहोर, करंजाळी, साक्री तालुक्यातील म्हसदी, ब्रह्मणवेल, पिंपळनेर, कुडाशी, उमरपट्टा, दहीवेल, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा, विखरण, नंदुरबार जिल्ह्याच्या नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी रणाळे, जळगाव जिल्ह्यातील म्हसवड, रावेर तालुक्यातील निंभोरा, पारोळा तालुक्यातील तामसवाडी, चोरवड, चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव, मेहुणबारे, हाटले, खडकी, जामनेर तालुक्यातील फत्तेपूर, पाचोरा तालुक्यातील पाचोरा, नांद्रा, पिंपळगाव, वरखेडी, भडगाव तालुक्यातील भडगाव, आमडदे मंडळात अतिवृष्टी झाली आहे..Farmers Relief: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत करणार .नगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातील सावेडी, केडगाव, वाळकी, रुईछत्तीशी, नेप्ती, पारनेर तालुक्यातील भालवणी, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, कर्जत तालुक्यातील कोंभळी, मिरजगाव, माही, जामखेड तालुक्यातील अरंगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, पाटोदा, सकट, शेगाव तालुक्यातील शेगाव, भटकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, इरंडगाव, दहिगाव, मुंगी, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, माणिकधोंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी, तिसगाव, खरवंडी, अकोला, नेवासा तालुक्यातील सलबतपूर, कुकाणा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे..सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग, होटगी, निम्बर्गी, विंचूर, बार्शी तालुक्यातील बार्शी, अगळगाव, गौडगाव, पांगाव, नारी, सुर्डी, माढा तालुक्यातील माढा, दरफळ, रोपळे, म्हैसगाव, करमाळा तालुक्यातील सालसे, पंढरपूर तालुक्यातील पुलज, सांगोला तालुक्यातील शिवणे, मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, मारवडे, मंगळवेढा, हुलजंती मंडळात अतिवृष्टी झाली आहे..Ativrushti Madat : जून ते ऑगस्टच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी रुपये मंजूर.सातारा जिल्ह्याच्या माण दहिवडी तालुक्यातील म्हसवड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील नांदर, लोहगाव, पैठण, पाचोड, विहामंडवा, आपेगाव, गंगापूर तालुक्यातील भेंडाळा, शेंदुरवडा, वैजापूर तालुक्यातील वैजापूर, खंडाळा, लोणी, जानेफळ, जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील सतोना, घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी, पिंपळगाव, अंतरवली, रांजणी मंडळाला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. .बीड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्याच्या बीड तालुक्यातील बीड, पाळी, नळवंडी, राजुरी, पिंपळनेर, पेंडगाव, मंजरसुंबा, चौंसाळा, नेकनूर, लिंबगणेश, चर्हाटा, पारगाव सिरस, कुरळा, पाटोदा तालुक्यातील पाटोदा, दसखेड, थेरला, अमळनेर, आष्टी तालुक्यातील आष्टी, कडा, टाकळसिंह, दावळवडगाव, धामणगाव, धनोरा, पिंपळा, दौठन, आष्टी हना, दादेगाव, गेवराई तालुक्यातील गेवराई, जातेगाव, पाचेगाव, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवकी, तालवडा, माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव, ताळखेड, नित्रूड, दित्रूड, अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई, उजनी, केज तालुक्यातील हनुमंत, विडा, नांदुरघाट, परळी तालुक्यातील धर्मापुरी, सिरसाळा, धारूर तालुक्यातील धारूर, मोहखेड, अंजनडोह, वडवणी तालुक्यातील वडवणी, कवडगाव, शिरूर कासार तालुक्यातील शिरूर, रायमोह, तिंतरवणी, ब्रम्हनाथ येळंब, गोमलवाडा, खालापुरी, लातूर जिल्ह्याच्या लातूर तालुक्यातील लातूर, हरंगुळ, मुरुड, गातेगाव, तांदुळजा, चिंचोळी, कानेरी, औसा तालुक्यातील किणी, निलंगा तालुक्यातील पानचिंचोळी, चाकूर तालुक्यातील नालेगाव, आष्टा, धाराशिव जिल्ह्याच्या धाराशिव तालुक्यातील शहर, ग्रामीण, जजगी, तुळजापूर तालुक्यातील सावरगाव, परांडा तालुक्यातील परांडा, आसू, जवळा, सोनारी, भूम तालुक्यातील आंभी, माणकेश्वर, भूम, वाळवड, इट, कळंब तालुक्यातील कळंब, इटकूर, शिरढोण, गोविंदपूर, लोहरा तालुक्यातील माकणी, वाशी तालुक्यातील वाशी, परगाव, तेरखेडा मंडळात अतिवृष्टी झाली आहे..परभणी जिल्ह्याच्या परभणी तालुक्यातील झरी, दैठणा, गंगाखेड तालुक्यातील माखणी, राणी, पिंपळदरी, जिंतूर तालुक्यातील बोरी, चारठाणा, दूधगाव, पालम तालुक्यातील चाटोरी, सेलू तालुक्यातील सेलू, देवळगाव, वालूर, कुपटा, चिकलठाणा, मोरेगाव, सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, शेलगाव, वडगाव, मानवत तालुक्यातील केकरजवळा, कोल्हा, ताडबोरगाव, रामपुरी, हिंगोली जिल्ह्याच्या बसमत तालुक्यातील कुरुंडा, औंढा तालुक्यातील जवळा मंडळात आणि बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.