Sangli News : जिल्ह्यातील २ हजार २१५ शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत फळ पीकविमा घेतला आहे. जत तालुक्यातील फळ पीकविमा घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सर्वांत जास्त विमा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली..अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी यासाठी फळ पीकविमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेत अर्ज करावा लागतो. नुकसान झाले तर, त्याचे पंचनामे होऊन भरपाई मिळते. जिल्ह्यात मृग बहारातील पुनर्रचित हवामान फळ पीकविमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे यासाठी कृषी विभागाने प्रचार आणि प्रसिद्धी केली..Crop Insurance : अहिल्यानगरमध्ये पीकविमा योजनेला प्रतिसाद कमीच.पुनर्रचित हवामान आधारित फळ पीकविमा २०२५-२६ साठी द्राक्ष, पेरू, लिंबू, डाळिंब, सीताफळ आणि चिकू उत्पादक शेतकऱ्यांनी विमा घेतला आहे. या योजनेत सर्वाधिक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे..जिल्हा कृषी विभाग फळ पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. परंतु नैसर्गिक आपत्तीने फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचे पंचनामे केले जातात. त्याचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला जातो. शासनाच्या निकषाप्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळते..Crop Insurance : पीकविमा अर्जाची संख्या ४२ हजार ५९५ ने घटली.फळ पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून फळ पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे..मृग बहारात फळ पीकविमा योजना दृष्टिक्षेपतालुका शेतकरीसंख्या क्षेत्र (हेक्टर)आटपाडी ११७ ९१.९१जत १४६९ ८३५.८७कवठेमहांकाळ २३१ ११६खानापूर ३३ १५.०१मिरज १२० ५९.५१पलूस २५ १२.८०तासगाव २१४ ९४.१२वाळवा ६ २.७३एकूण २२१५ १२२८पीक शेतकरी संख्यासीताफळ २द्राक्ष ९३६पेरू ५लिंबू ९डाळिंब १२६२चिकू १.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.