Yavatmal News: कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात एकट्या जानेवारी महिन्यात २२ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. परिणामी प्रशासनाच्या शेतकरी हिताचे उपक्रम व योजनांच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. .गेल्या वर्षीच्या खरिपात सुरुवातीला पावसाने खंड दिला. त्यानंतरच्या काळात मात्र पीक फुलोरा आणि बोंड धरण्याच्या अवस्थेत असताना अतिवृष्टीने कापूस व सोयाबीनचे हजारो हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झाले. पीकविमा कंपन्या नुकसान मान्य करण्यास टाळाटाळ करत आहेत, तर प्रशासन एकमेकांकडे जबाबदारी ढकलण्यात व्यस्त आहे. नुकसान शेतकऱ्याचे झाले, पण मदतीचा लाभ दलाल आणि कागदी प्रक्रियेलाच मिळतो, अशी तीव्र भावना ग्रामीण भागात उमटत आहे..Farmer Death: अंबासनमध्ये शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असताना हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा श्वास कोंडत चालला आहे. यवतमाळ, दिग्रस, नेर, कळंब, राळेगाव, आर्णी, पुसद, उमरखेड, महागाव, घाटंजी, बाभूळगाव, मारेगाव आणि वणी या तालुक्यांत आत्महत्यांची भीषण मालिका समोर आली आहे. जानेवारी महिना हा ३१ दिवसाचा असताना जिल्ह्यात तब्बल २२ शेतकरी आत्महत्यांची नोंद करण्यात आली..Farmer Deaths: यवतमाळ जिल्ह्यात ३३४ दिवसांत ३४२ आत्महत्या.घरखर्च, कर्जफेड, मुलांचे शिक्षण आणि उपचारांचा ताण सहन न झाल्याने अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेत असल्याची विदारक परिस्थिती आहे.शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अपुरी ठरत आहेत, पीकविम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत आणि बाजारात शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी जगण्यासाठी झगडतो आहे, असेच चित्र सर्वदूर आहे, अशी प्रतिक्रिया या पार्श्वभूमीवर रामकृष्ण पाटील यांनी व्यक्त केली..जिल्ह्यात २६६ रुपयांचे युरियाचे पोते ३८० रुपयात विकले जात आहे. त्यावर कृषी विभागाकडून तक्रारीशिवाय कारवाई होत नाही. शेतमालाच्या भावाची कुणाला चिंता नाही. अमेरिकेसोबत करार करताना देशातील शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही. अशाप्रकारे शेतकऱ्यांना चक्रव्यूहात अडकविण्यात आले आहे. त्याला बाहेर निघण्याचा मार्ग सापडत नाही. -मनीष जाधव, प्रदेश प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.