Nanded News: शेतकरी नेते माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय किसान दिन ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र वसंतनगर नांदेड येथे २१ शेतकऱ्यांचा शाल, सन्मानपत्र देऊन ब्रह्माकुमारीज संयुक्त प्रशासिका संतोष दीदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..यावेळी राजयोगिनी संतोष दीदी यांनी शेतकरी या हा अन्नदाता नाही तर तो राष्ट्र निर्माता आहे शहरी जीवनाचा पाया हा ग्रामीण शेतीवर अवलंबून आहे . सर्वांनी शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करावी शेतकऱ्यांना मान सन्मान द्यावा, शेतकऱ्यांनी कमी खर्चाची विषमुक्त शाश्वत नैसर्गिक योगिक शेतीकडे वळावे ही काळाची गरज आहे..National Fish-Farmer Day : प्रेरित प्रजननाचे जनक .ब्रह्मकुमारीज कृषी ग्रामविकास प्रभागद्वारे भारतभर शेतकऱ्यांना नैसर्गिक योगिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी माउंट आबूला येण्याचे सर्वांना निमंत्रण दिले. यावेळी कृषिभूषण भगवान भाई इंगोले यांनी रासायनिक खताचे, औषधांचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. आज घराघरांमध्ये कॅन्सर सारखे दुर्गादार आजार वाढत आहेत. .National Farmers Day 2025: आज शेतकरी दिवस, चौधरी चरण सिंह यांचे शेतकऱ्यांसाठी योगदान काय?.पर्यावरणाचे संवर्धन करणारी चांगल्या आरोग्यासाठी विषमुक्त शाश्वत योगिक शेती करावी व इतरांना पण नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रेरित करावे, असे सांगितले. यावेही ब्रम्हकुमारी स्वाती बहनजी यांनी आपण जसे फॅमिली डॉक्टर निवडतो तसा फॅमिली शेतकरी निवडावा. जेणेकरून आपल्याला विषमुक्त नैसर्गिक अन्नास पुरवठा होईल. आपले मन प्रसन्न आणि आरोग्य निरोगी राहील, शेतकरी सन्मार्तीमध्ये, सत्यनारायणभाई मंत्री, माधव कदम, विश्वनाथ होळगे,.बालाजी महादवाड, सतीश तळेगावकर, कृषीसखी अनिता अमोल सावंत, आशा संजय खराटे, दिलीप निळेकर, संजय मामीडवार, व्यंकटेश कुलकर्णी, अभय केसराळीकर, राजेंद्र शंकर पुरे आदी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.