उज्ज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्कPatna News: ‘दो हजार पच्चीस...फिर से नितीश...’ असा नारा बिहारमध्ये देण्यात आला, तेव्हा विरोधकांनी तो गांभीर्याने घेतला नाही, हेच बिहारच्या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे. ‘नितीश-मोदी’ जोडीने सामाजिक समीकरणे ‘एनडीए’च्या बाजूने झुकवली आणि महाआघाडीचा सामाजिक पाया पूर्णपणे कोलमडला. तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यासाठी हा धक्का आहे. ‘एनडीए’ने केलेल्या प्रचारावर आणि निवडणूक रणनीतीवर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला आहे. दीड कोटी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले..मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतरही विरोधकांचे आरोप लोकांनी फेटाळून लावले. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी आपल्या प्रचारसभांमध्ये सातत्याने नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती. बिहारमधील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार यासारखे मुद्देही निवडणूक निकालांमध्ये प्रतिबिंबित झाले नाहीत. विरोधकांच्या आरोपांचा मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यांच्या या विजयामागे काही मुद्दे महत्त्वाचे आहेत..Bihar Election 2025: बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! खात्यात १० हजार, १० व्यांदा नितीश कुमार; लाडक्या बहिणींनी NDAला तारलं .नितीश-मोदी जोडीला कौलनिवडणुकीपूर्वीच नितीश सरकारने रोजगार सुरू करण्यासाठी महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवले. यापूर्वी, निवृत्तिवेतनाचे पॅकेज आणि अशाच अनेक सवलतींमुळे मतदार संभ्रमित झाले होते. विशेषतः महिला मतदारांनी एनडीएच्या बाजूने मतदान केले. जेडीयू असो किंवा भाजप, लोकजनशक्ती पक्ष किंवा उपेंद्र कुशवाहांचा राष्ट्रीय लोक मोर्चा, प्रत्येकाचा ‘स्ट्राइक रेट’ खूप चांगला होता. ‘एनडीए’च्या विजयाची गुरुकिल्ली म्हणजे नितीशकुमार-नरेंद्र मोदी यांची युती होती. या दोन्ही नेत्यांच्या ‘केमिस्ट्री’ने बिहारच्या मतदारांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले. या दोन्ही नेत्यांनी अनेक बैठकांमध्ये एकट्याने प्रचार केला. त्यानंतर दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चाही झाली. मात्र त्याचा मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही..Bihar Election Results 2025: बिहारमध्ये 'एनडीए' द्विशतकाच्या दिशेने, सर्वात मोठा पक्ष कोणता?; RJD ला धक्का.‘ही’ मते निर्णायक‘ईबीसी’ आणि मुस्लिम या दोन्ही सामाजिक गटांची मते खूप महत्त्वाची आहेत. जेव्हा निवडणुकांचा प्रश्न येतो, तेव्हा ही मते वगळून कुठलाही पक्ष विजयाचा विचार करू शकत नाही. अत्यंत मागासवर्गीयांना अंदाजे ३५ टक्के आणि मुस्लिमांना १७ टक्के मते मिळाली आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, नितीशकुमार हे या मतांचे सर्वात मोठे दावेदार आहेत. सीमांचलच्या चार जिल्ह्यांमध्ये महाआघाडीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पूर्णिया, कटिहार, अरारिया आणि किशनगंजमधील २४ पैकी १५ जागांवर ‘एनडीए’ आघाडीवर होती..‘महाआघाडी’ला धक्का‘महाआघाडी’साठी हा निकाल मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांच्या धोरणांमध्ये चुका तर होत्याच, शिवाय विविध सामाजिक घटकांचे योग्य आकलन न झाल्याने मतदारांनी त्यांना नाकारले. राष्ट्रीय जनता दलाने आपली सामाजिक वीण अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला खरा. मात्र तो यशस्वी झालेला नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.