Milk Adulteration Action: ‘भेसळयुक्त’ २० हजार लिटर दूध थेट कालव्यात फेकले
Food and Drug Administration Action: अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर कारवाईच्या धास्तीने पंढरपूर तालुक्यातील सुपली येथील उजनी उजव्या कालव्यात तब्बल २० हजार लिटर संशयित भेसळयुक्त दूध सोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.