Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिपक्व झालेले ५ टक्के भातपीक सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीवर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे दोन हजार हेक्टरवरील भातपीक नुकसानीच्या उंबरठ्यावर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..जिल्हयात मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूनच्या विस्कळितपणामुळे तीन चार टप्प्यांत भात रोपवाटिकांची कामे करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात भातरोप पुनर्लागवड करण्यात आलेल्या दोन ते अडीच हजार हेक्टरवरील भातपीक परिपक्व झाले आहे..Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका.मात्र गेले दहा पंधरा दिवस सतत पाऊस पडत आहे. काही भागांत जोरदार तर काही भागांत हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे परिपक्व झालेले भातपीक आता जमिनीवर कोसळण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे भातपीक जमिनीवर कोसळत असताना दुसरीकडे पावसाचा जोर कायम आहे..Paddy Crop Damage : चंद्रपुरात धान पिकावर पुराचे संकट.हवामान विभागाने २ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत भातपिकाची कापणी करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पुढील सहा-सांत दिवसांत भातपिकाची कापणी करता आली नाही तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे..जिल्ह्यात पाऊस सुरूचजिल्हयात पावसाची रिपरिप कायम आहे. सोमवारी (ता. २२) रात्री अनेक भागांत जोरदार सरी बरसल्यानंतर मंगळवारी (ता. २३) सकाळपासून काही भागांत हलक्या सरी सुरू आहेत. काही भागांत ढगाळ वातावरण आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.