Manchar News: मंचर नगरपंचायतीच्या दक्षिण बाजूला अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नर-मादी व तीन बछडे असा पाच बिबट्यांचा कळप दिसल्याने परिसरात पुन्हा दहशत पसरली आहे. शेतीची नांगरट करणारे प्रदीप व ओम थोरात यांना बुधवारी (ता.५) रात्री सातच्या सुमारास बिबटे दिसले. .तत्काळ किरण थोरात व इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा करून त्यांना हुसकावले. मंचर शहर व सहा ते सात किलोमीटर परिसरातील गावांमध्ये २० बिबट्यांचा वावर व दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे..Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू.पेठ (ता.आंबेगाव) येथे एकूण सात पोल्ट्री शेड आहेत. सलग दोन दिवस बिबट्याने पोल्ट्री शेडवर बैठक मारल्याची घटना घडली असून, मालकांनी त्याचे चित्रीकरण केले आहे. मेलेल्या कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी बिबट्या पोल्ट्रीजवळ येतो, अशी माहिती शिवाजीराव पवळे, शंकरराव पवळे, भरत पवळे, नरेंद्र पवळे व शिवाजी धुमाळ आदी पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली..Leopard Attack: भयारण्य बिबट्यांचे....नागरिकांना अद्याप थेट इजा झाली नसली तरी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनखात्याने तातडीने पिंजरा लावावा, अशी त्यांची मागणी आहे..मंचर, भिलवाडी, पेठ, वडगाव काशिंबेग, लांडेवाडी व निघोटवाडी या भागात सात पिंजरे लावले आहेत. आदर्शगाव गावडेवाडी येथे बिबट शीघ्र कृती दलाचे सात सदस्य व २० कर्मचारी रात्री गस्त घालून नागरिकांना सतर्क करत आहेत.विकास भोसले, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.