Chhatrapati Sambhajinagar News: भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार मतदारयादीच्या प्रारूप प्रसिद्धीची तारीख ३ डिसेंबर होती. त्यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार विभागात एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदार असल्याची माहिती पुढे आली आहे..विभागीय आयुक्त कार्यालयात या कार्यक्रमावेळी विभागीय आयुक्त तथा ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर, अपर आयुक्त सामान्य प्रशासन तथा सहायक मतदार र्नादणी अधिकारी मंजूषा मिसकर यांच्यासह तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते..Agriculture Graduate Recruitment : कृषी पदवीधरांना नोकरभरतीची प्रतीक्षा....अशी आहे मतदार संख्याछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ४६ हजार ४०६ पुरुष, १५ हजार ९०८ महिला व ४ तृतीयपंथी असे एकूण ६२ हजार ३१८ मतदार आहेत. जालना जिल्ह्यात एकूण २३ हजार ६४८ पुरुष, ५ हजार २७२ महिला तर २ तृतीयपंथी असे एकूण २८ हजार ९२२ मतदार आहेत. परभणी जिल्ह्यात १६ हजार ६३५ पुरुष, ४ हजार ६४ महिला तर १ तृतीपंथी असे एकूण २० हजार ७०० मतदार आहेत. हिंगोली जिल्ह्यात ६ हजार ४७६ पुरुष, १ हजार ५२८ महिला असे एकूण ६ हजार ४ मतदार आहेत. नांदेड जिल्ह्यात २३ हजार ८६७ पुरुष, ६ हजार २६४ महिला तर ४ तृतीयपंथी असे एकूण ३० हजार १३५ मतदार आहेत. लातूर जिल्ह्यात १७ हजार ४९२ परुष, ४ हजार ९९३ महिला तर २ तृतीयपंथी असे एकूण २२ हजार ४८७ मतदार आहेत..Voter List: मतदार यादीतील त्रुटींवर वाद पेटणार? ‘एकगठ्ठा’ हरकतींना निवडणूक आयोगाने घातली बंदी.धाराशिव जिल्ह्यात १६ हजार ७६२ पुरुष, ४ हजार ४७ महिला असे एकूण २० हजार ८०९ मतदार आहेत. बीड जिल्ह्यात ३४ हजार ४८५ पुरुष, ९ हजार ६८७ महिला तर २ तृतीयपंथी असे एकूण ४७ हजार १७४ मतदार आहेत. विभागातील आठही जिल्ह्यांतमिळून एकूण १ लाख ८८ हजार ७७१ पुरुष, ५१ हजार ७६३ महिला तर १५ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ४० हजार ५४९ मतदारआहेत..अंतिम मतदारयादी १२ जानेवारीला होणार प्रसिद्धपुढील अत्यंत महत्त्वाचा टप्पा, म्हणजेच दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (कलम १२ अन्वये) हा ३ ते १८ डिसेंबर असा निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत प्राप्त र्व दावे व हरकती ५ जानेवारी, २०२६ पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी १२ जानेवारी, २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.