Nanded News: या हंगामात जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर आतापर्यंत एकूण १ लाख ९२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. यापैकी १ लाख ४३ हजार क्विंटल कापूस सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कडे तर ४९ हजार क्विंटल कापूस खासगी व्यापाऱ्यांकडे विकला गेला आहे. मात्र, ही आकडेवारी समाधानकारक वाटत असली तरी प्रत्यक्षात शासकीय खरेदी केंद्रांवरील संथ गतीमुळे शेतकऱ्यांची अडचण वाढत असल्याचे चित्र आहे..जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र, सहाच खरेदी केंद्रांवर होत आहे. कारण लोहा येथील फॅक्टरीचे काम अपूर्ण असल्यामुळे तेथे अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना कळदगाव केंद्रावर पाठवण्यात आले असून, अंतर, वाहतूक खर्च आणि वेळेचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. केंद्रांवर अपुरी यंत्रणा, कर्मचारी कमी, वजनकाट्यांची अडचण आणि ऑनलाइन नोंदणीतील त्रुटी यामुळे दिवसेंदिवस रांगा वाढत आहेत..Cotton Procurement: सव्वा लाख क्विंटलने घसरली यंदाची कापूस खरेदी.अनेक वेळा दोन-तीन दिवस केंद्रावर थांबूनही खरेदी न झाल्याने खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागत आहे. सरकार हमीभाव जाहीर करते, पण वेळेत खरेदीच झाली नाही तर त्याचा उपयोग काय? खर्च वाढतो, कापसाची गुणवत्ता घसरते आणि शेवटी तोटा शेतकऱ्यांचाच होतो. .CCI Cotton Procurement: दहा हजार शेतकऱ्यांकडून ‘सीसीआय’ला कापूस.दरम्यान, शेतकरी संघटनांनी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, लोहा येथील फॅक्टरीचे काम तातडीने पूर्ण करावे आणि सीसीआयने दररोजची खरेदी क्षमता वाढवावी, अशी मागणी केली आहे..जिल्ह्यातील सात केंद्रांवरील खरेदी अशीई-एसपीआर प्रणालीअंतर्गत सुरू असलेल्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. ८ जानेवारी २०२६ पर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर खरेदी केंद्रावर ६७७२९ क्विंटल, धर्माबाद २५,३१४ क्विंटल, तामसा-हदगाव ३०,२४२ क्विंटल, नांदेड १०,९१६ क्विंटल, नायगाव ४२ हजार ८५ क्विंटल, लोहा केंद्राद्वारे ०, तर किनवट येथील खरेदी केंद्रावर १६,३६२ क्विंटल याप्रमाणे एकूण १ लाख ९२ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.