Ratnagiri News: आंबिया बहरातील आंबा, काजू फळपीक विमा योजनेचा जिल्ह्यातील ३६ हजार २८८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून १८ हजार ०९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. गतवर्षीएवढ्याच बागायतदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी २१ कोटी ८४ लाख ६६ हजार रुपये भरले आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली..शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते. .त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या ८३ महसूल मंडळातील आंबा व काजूपिकांच्या फळबागांना विमा संरक्षण दिले जात आहे.१ जानेवारी ते १५ मे या कालावधीत किमान तापमान, कमाल तापमान, वेगवान वारा, अवकाळी पाऊस या हवामान बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपोटी बागायतदारांनी भरपाई मिळणार आहे. .Fruit Crop Insurance: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी .३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरवण्याची मुदत होती.त्याला गतवर्षीएवढाच प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये २६ हजार २१२ कर्जदार आणि १० हजार ७६ बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी १८ हजार ०९५ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवलेला असून.Fruit Crop Insurance: आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना.सर्वाधिक प्रतिसाद आंबा बागायतदारांचा आहे.दरम्यान, गेल्या वर्षी नुकसानीपोटी १०० कोटीचा लांभाश ३२ हजार बागायतदारांना मिळाला होता; .परंतु परतावा जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे बागायतदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.