Parbhani News: कृषी समृद्धी योजना २०२५ अंतर्गत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण योजनांचा लाभ देण्यासाठी १७ कोटी ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या अंतर्गत महाडीबीटी पोर्टलद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..जिल्ह्यात कृषी समृद्धी योजनेअंतर्गत गावपातळीवर मृदा तपासणी प्रयोगशाळांसाठी ८२ लाख ५० हजार रुपये, गोदाम (२ हजार टन क्षमता) बांधकामांसाठी (स्मार्ट योजना) ४ कोटी रुपये, दहा ड्रम थियरीसाठी १ कोटी रुपये, गोदाम (२५० टन क्षमता) बांधकामासाठी (खाद्यतेल अभियान) १ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये, शेळी-मेंढी पालनसाठी १० लाख रुपये, .शेतीमाल थेट विक्रासाठी फिरते वाहन विक्री केंद्र सुविधेसाठी ४५ लाख रुपये, पोर्टेबल भाजीपाला, फळविक्री स्टॉलसाठी ५ लाख रुपये, भाजीपाला, फळांची काढणीपश्चात हाताळणीकरिता प्लॅस्टिक क्रेटसाठी ९ लाख ९९ हजार रुपये, अन्नधान्य वाळविण्यासाठी ताडपत्री वितरणासाठी ९ लाख ९९ हजार रुपये, गांडूळ खत बेडसाठी १० लाख रुपये, सुपरकेन नर्सरीसाठी ५ लाख रुपये मंजूर आहेत..Krishi Samruddhi Yojana: काय आहे कृषी समृद्धी योजना; शेतकऱ्यांना काय फायदे?.केळीसाठी स्कर्टिब बॅगसाठी ९९ लाख ९९ हजार रुपये, बांधावरील जैविक प्रयोगशाळा उभारणीसाठी ६ लाख रुपये, सोलार ड्रायरसाठी १६ लाख रुपये, मुरघास युनिटसाठी ५ लाख रुपपये, कापूस जिनिंग युनिटसाठी ४० लाख रुपये, स्पायरल सेपरेटरसाठी ८ लाख रुपये, सोलार लाइट ट्रॅपसाठी १० लाख रुपये,.Krishi Samriddhi Yojana : ॲग्रोवन कृषी समृद्धी योजना २०२३’ला प्रारंभ.जलतारा निर्मितीसाठी १० लाख रुपये, खजूर लागवडीसाठी ९८ लाख रुपये, जिल्हा अंतर्गत प्रशिक्षणासाठी ५० लाख रुपये, राज्यअंतर्गत प्रशिक्षणसाठी ४० लाख रुपये,.राज्यबाहेरील प्रशिक्षणासाठी १० लाख रुपये मंजूर आहेत. हरभरा प्रात्यक्षिकासाठी ९९ लाख रुपये, सौर तार कुंपणासाठी ३० लाख रुपये, निर्जलीकरण प्रक्रिया युनिटसाठी ५ लाख निधी मंजूर आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.