Nagpur News: देशात वाघ संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न सुरू असताना वाघांचे वाढते मृत्यू चिंताजनक ठरत आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) ताज्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये देशभरात एकूण १६९ वाघांचे मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी (२०२४) ही संख्या १२४ इतकी होती. अवघ्या एका वर्षात वाघांच्या मृत्यूंत ४५ ने वाढ झाली आहे. महाराष्ट्रात २०२५ मध्ये तब्बल ४१ वाघांचे मृत्यू झाले आहेत. .वाघांचे नैसर्गिक अधिवास, मानवी हस्तक्षेप, अपघात, आजारपण आणि अवैध शिकारीसारखी कारणे या मृत्यूंमागे आहेत. यंदा मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक ५५ वाघांचे मृत्यू झाले असून देशात हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ४१ वाघांचे मृत्यू नोंदवले गेले असून वाघ मृत्यूंबाबत राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी वाघांच्या मृत्यूंमध्ये अव्वल असलेल्या महाराष्ट्राने यंदा काही प्रमाणात हे मृत्यू रोखण्यात यश मिळवले असले, तरी ही आकडेवारी अजूनही चिंताजनक मानली जात आहे..Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात ४७ बळी.वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वाघांच्या मृत्यूमागे नैसर्गिक कारणांसह मानवी हस्तक्षेप, अधिवासावर वाढता ताण, वनक्षेत्रातील संघर्ष, अपघात, आजार आणि काही ठिकाणी बेकायदेशीर शिकारीसारख्या कारणांचा समावेश आहे. वाघांची संख्या वाढल्याने काही व्याघ्र राखीव क्षेत्रांवर ताण वाढत असून त्यातून संघर्षाच्या घटना वाढत असल्याचेही निदर्शनास येत आहे..मागील वर्षी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांत २०२५ ची सुरुवात वाघांच्या मृत्यूने झाली. तर आता वर्षअखेरीस देखील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी कमी न होता वाढलेली आहे. महाराष्ट्रातदेखील हीच स्थिती आहे. महाराष्ट्रातील एकूण वाघांच्या मृत्यूंपैकी सुमारे एक तृतीयांश मृत्यू हे व्याघ्र प्रकल्प किंवा संरक्षित क्षेत्राच्या बाहेर झाले आहेत. २०२५ च्या अखेरच्या दिवशी वर्धा जिल्ह्यात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या ४१ वाघांमध्ये २० नैसर्गिक, ७ रस्ते अपघातात मरण पावले, तर ९ मृत्यूंचे कारण कळले नसून एक विषबाधा, ७ विजेच्या धक्क्याने मरण पावले आहेत..Tiger Conservation: राज्यातील साडेचारशे वाघांना ‘रेडिओ कॉलर’ लावणे अशक्य.देशभरात वाघांचे मृत्यू२०२५ १६९२०२४ १२४महाराष्ट्र वाघांचे मृत्यू२०२३ ४६२०२४ २३२०२५ ४१.राज्यात वाघांच्या संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वाघांच्या संवर्धनासाठी त्यांचे स्थलांतरण करण्यावर भर दिला जात आहे. मरण पावलेल्या वाघांमध्ये नैसर्गिकरित्या मृत झालेल्या वाघांची संख्या अधिक आहे. शिकार, विजेचा धक्का, रेल्वे अपघातात वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे.श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.