Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२५) रब्बी हंगामात २६ नोव्हेंबर पर्यंत विविध ग्रेडच्या १५ हजार १५० टन रासायनिक खतांची विक्री झाली. तर ४४ हजार ३५९ टन खते शिल्लक होती, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली..रब्बी हंगाम २०२५-२६ साठी परभणी जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्याकडून विविध ग्रेडच्या ५५ हजार ८५० टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. कृषी आयुक्तालयाकडून ६६ हजार ८५० टन खतसाठा मंजूर करण्यात आला. त्यात युरिया २१ हजार टन, डीएपी ६ हजार ५०० टन, पोटॅश (एमओपी) २ हजार ३५० टन, संयुक्त खते (एनपिके) ३० हजार ५०० टन, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) ६ हजार ५०० टन या खतांचा समावेश आहे. नोव्हेंबर अखेर १९ हजार ९७४ टन खतसाठा मंजूर आहे. रब्बी हंगामासाठी १ ऑक्टोबरपासून आजवर २ हजार ३०५ टन खताचा पुरवठा करण्यात आला..Fertilizer Sales: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ई-पॉसवरील खतसाठ्यात तफावत नको.३० सप्टेंबर अखेरपर्यंत ३७ हजार ९८१ टन खतसाठा शिल्लक होता. त्यामुळे एकूण ४० हजार २८५ टन खते विक्रीसाठी उपलब्ध होती. २२ नोव्हेंबरपर्यंत विविध ग्रेडच्या २ हजार २९३ टन खतांची विक्री झाली. त्यात युरिया ४१६ टन, डीएपी ४७५ टन, पोटॅश १०१ टन, एनपीके ८८९ टन, सुपर फॉस्फेट ४१० टन या खताचा समावेश आहे. एकूण ३७ हजार ९९२ टन खते शिल्लक होती. रब्बी हंगाम २०२५-२६ साठी हिंगोली जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्याकडून विविध ग्रेडच्या ७० हजार ४८९ टन खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. .Fertilizer Sale Tracking: खत विक्रीवर नव्या प्रणालीची नजर.कृषी आयुक्तालयाकडून ५० हजार ७५० टन खतसाठा मंजूर करण्यात आला. त्यात युरिया ४ हजार ४२० टन, डीएपी २ हजार २५० टन, पोटॅश (एमओपी) ७०० टन, संयुक्त खते (एनपिके) १९ हजार ५०० टन, सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) ५ हजार ५०० टन या खतांचा समावेश आहे. नोव्हेंबर अखेर १५ हजार ९५ टन खतसाठा मंजूर आहे. रब्बी हंगामासाठी १ ऑक्टोंबर पासून आजवर १३ हजार ७९९ टन खताचा पुरवठा करण्यात आला. .३० सप्टेंबर अखेर पर्यंत ५ हजार ४३५ टन खतसाठा शिल्लक होता. त्यामुळे एकूण१९ हजार २४१ टन खते विक्रीसाठी उपलब्ध होती. २६ नोव्हेंबरपर्यंत विविध ग्रेडच्या २२ हजार ८५७ टन खतांची विक्री झाली. त्यात युरिया २ हजार ८८२ टन, डीएपी १ हजार ७८४ टन, पोटॅश ५७७ टन, एनपीके ५ हजार ९८६ टन, सुपर फॉस्फेट १४८ टन या खताचा समावेश आहे..परभणी व हिंगोलीची खत स्थिती (नोव्हेंबर २०२५ अखेर)तपशील एकत्रित संख्या (टन)एकूण मागणी (कृषी विभाग) १ लाख २६ हजार ३३९एकूण मंजूर साठा १ लाख १७ हजार ६००विक्रीसाठी उपलब्ध एकूण साठा ५९ हजार ५२६एकूण विक्री १५ हजार १५०एकूण शिल्लक साठा ४४ हजार ३५९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.