Chh. Sambhajinagar News : बैठकीत जिल्ह्यात कृषी विस्तार सुधारणा साहाय्य कार्यक्रमासाठी २०२५-२६ साठी २ कोटी ३६ लाख ४७ हजार रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच जिल्ह्यात १५ ठिकाणी ग्रामस्तरीय माती परिक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली..‘आत्मा’ नियामक मंडळाची आढावा बैठक सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, कृषी सह संचालक सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नानासाहेब कदम, प्रभारी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. पडीले तसेच अन्य सदस्य उपस्थित होते..AATMA Employee Issue : मानधन वाढ नसल्यास इतर योजनांचे काम करणे शक्य नाही.जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी आहे. शिवाय रेशीम उत्पादनही कमी आहे. हे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून या व्यवसायांना चालना देण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. .AATMA Employee Welfare : साहेब... शैक्षणिक पात्रता, अनुभव, सेवा कालावधीनुसार न्याय द्या.विस्तार कार्यात याबाबींचा समावेश करावा. तसेच जिल्ह्यात नैसर्गिक, सेंद्रिय शेती खालील क्षेत्रातही वाढ होईल यासाठी प्रयत्न करावे. त्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश श्री. स्वामी यांनी दिले..‘मिल्क टू सिल्क’ या व्यवसायांकडे वळण्याची गरजशेतीतील अशाश्वतता व जिल्ह्याची गरज पाहता आपल्या जिल्ह्यात दूध व रेशीम उत्पादनास चांगला वाव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ‘मिल्क टू सिल्क’ या व्यवसायांकडे वळविण्यासाठी कृषी विभागाने उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.जिल्ह्यात नैसर्गिक, सेंद्रिय शेती खालील क्षेत्र वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.