Sangli News : जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसाठी ऑगस्टअखेर पीक कर्जाचे १४६७ कोटी ३५ लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. पुढच्या महिन्यापासून रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वितरण सुरू होईल. रब्बी हंगामात १ लाख १२ हजार १८७ शेतकऱ्यांना १३४२ कोटी ३९ लाखांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली..जिल्ह्यातील जिल्हा बॅंक, राष्ट्रीय, व्यापारी बॅंका, खासगी, ग्रामीण बॅंकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील ऊस, सोयाबीन यासह डाळिंब, द्राक्ष पिकांसाठी पीककर्ज दिले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी सांगली जिल्हा बॅंकेसाठी ९३ हजार ३६७ शेतकऱ्यांना ११३३ कोटी ५६ लाख इतका लक्ष्यांक आहे. .Crop Loan : पीक कर्ज वितरणात ‘डीसीसी’चा वाढता आलेख.राष्ट्रीय, व्यापारी बँकांना ४७ हजार ५५१ शेतकऱ्यांना ५७८ कोटी ३१ लाख, खासगी बॅंकांसाठी २४ हजार २९४ शेतकऱ्यांना २९५ कोटी ८२ लाख आणि ग्रामीण बॅंकांना ४५३ शेतकऱ्यांना ५ कोटी ६१ लाख असे एकूण १ लाख ६५ हजार ६६५ शेतकऱ्यांना २०१३ कोटी ३० लाख रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे..जिल्ह्यातील जिल्हा बॅंक, राष्ट्रीय, व्यापारी बॅंका, खासगी, ग्रामीण बॅंकांनी १ लाख ३३ हजार १६३ शेतकऱ्यांना १४६७ कोटी ३५ लाखांचे कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंकेने सर्वाधिक शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले आहे. .Crop Loan : परभणी जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती दूर.खरिपासाठी सप्टेंबरअखेर कर्ज वितरित केले जाते. अर्थात अद्याप कर्ज वितरणासाठी वीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे ९० टक्क्यांपर्यंत कर्ज वितरण होईल, असा अंदाज संबंधित विभागाने व्यक्त केला आहे..रब्बी हंगामातील कर्ज वितरणाची तयारी पुढच्या म्हणजे ऑक्टोबरपासून सुरू होईल. रब्बी हंगामात १ लाख १२ हजार १८७ शेतकऱ्यांना १३४२ कोटी ३९ लाख कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये जिल्हा बॅंकेला ३२ हजार ९९३ शेतकऱ्यांना ७५५ कोटी ७९ लाखाचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. .तर राष्ट्रीय, व्यापारी बॅंकांना ३२२०७ शेतकऱ्यांना ३८५ कोटी ६० लाख, खासगी बॅंकांसाठी १६ हजार ६६६ शेतकऱ्यांना १९७ कोटी २६ लाख आणि ग्रामीण बॅंकांना ३२१ शेतकऱ्यांना ३ कोटी ७४ लाख असे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले आहे.ऑगस्टअखेर खरीप हंगामातील पीककर्ज वितरण स्थितीबॅंक सभासद संख्या रक्कमजिल्हा बॅंक ११६७०९ १०४८ कोटी ९२ लाखराष्ट्रीय, व्यापारी बॅंका १३८२४ ३०३ कोटी ८९ लाखखासगी बॅंका २४१५ ११०कोटी ९२ लाख.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.