Sangali News: येथील तलावातून पेड, मांजर्डे, मोराळे, गौरगाव या गावांतील शेतीला पाणी देण्यासाठी मागील पाच वर्षांपासून १४ कोटी रुपये खर्च करून बंदिस्त वितरिका टाकण्यात आली. त्यासाठी या तलावातून पाच वर्षांपूर्वी पावसाळ्यात चर काढली आहे. त्याचे काम निकृष्ट झाल्याने तलावाला गळती लागली आहे. दररोज लाखो लिटर पाणी वाया जाऊ लागले आहे..मागील एक-दोन वर्षांपूर्वी संबंधित ठेकेदाराने तलावाला लागलेली गळती काढण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा गळती निघाली नाही. परिणामी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तलावातून ५० ते ६० टक्के पाणी वाया गेले आहे..Water Leakage: शिवथर बंधाऱ्याला गळती.त्यामुळे पाणीपातळी खालावली आहे. ऐन उन्हाळ्यात पेडचा तलाव कोरडा पडू लागला आहे. लाभक्षेत्रातील शेकडो एकरातील द्राक्ष, ऊस व भाजीपाला ही पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत..उन्हाळा सुरू होण्याआधीच तलाव कोरडा पडू लागलाय. मागील पाच वर्षांपासून तलावाला गळती लागली असताना पाटबंधारे विभागाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. .पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षपेड तलावाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ही पाटबंधारे विभागाची आहे. मात्र या तलावाला गळती लागली आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. ठेकेदारावर राजकीय वरदहस्त असल्यानेच त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस पाटबंधारे विभाग का करत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.