Sangli News: राज्यात यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका डाळिंब बागांना बसला. परिणामी उत्पादन आणि दर्जेदार फळे कमी प्रमाणात हाती लागत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे. या वर्षी आतापर्यंत १३ हजार ७७२ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदणी केली असून, आणखी संख्या वाढीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातून गेल्या वर्षी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी सुमारे २२ हजार शेतकऱ्यांनी (मार्चपर्यंत) नोंदणी केली होती. .तर, गेल्या वर्षभरात सुमारे १९,६७६ टन डाळिंब निर्यात झाली होती. वास्तविक, गेल्या तीन ते चार वर्षांपासून डाळिंबावर नैसर्गिक संकटांची मालिका सुरू असतानाही शेतकरी निर्यातीसाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. युरोपियन देशासह आखाती, बांगलादेशात निर्यात मोठ्या प्रमाणात होते..Pomegranate Farming: डाळिंबासाठी रोग, किडीपेक्षा हवामानबदल घातक.राज्यातून यंदाच्या हंगामात डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी सुरू आहे. ११ हजार २७ शेतकऱ्यांनी निर्यातीसाठीच्या परवान्यांचे नूतनीकरण केले आहे, तर २७२४ शेतकऱ्यांनी नवीन परवाने घेतले आहेत. यंदा मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने डाळिंबाच्या हंगामाचे नियोजन विस्कळित केले. त्यातूनही शेतकऱ्यांनी बागांचा बहर धरला. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला..सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्राचीमहाराष्ट्रापेक्षा या राज्यांतून निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमीच असते. यंदाच्या हंगामातही अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे चित्र आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान आणि तमिळनाडू या राज्यांतून एकूण १३ हजार ८२४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. अर्थात महाराष्ट्रातून सर्वाधिक नोंदणी झाली असल्याचे अपेडाच्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. राज्यातील डाळिंबाला जगातील बाजारपेठेत मोठी मागणी असते..Pomegranate Export : डाळिंबाच्या निर्यात, प्रक्रियेतील संधीचा फायदा घ्या.जिल्हानिहाय निर्यातीसाठी झालेली नोंदणीअहिल्यानगर ६९९छ. संभाजीनगर..१४बुलडाणा ३धुळे २९जळगाव १४.नाशिक १५पुणे २२८५सांगली १२३७सातारा २सोलापूर ९४७४एकूण...१३७७२.हवाई आणि समुद्रामार्गे डाळिंबाची निर्यात डाळिंब संशोधन केंद्र व अपेडाच्या सहकार्याने सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातून डाळिंब निर्यातीला मोठी संधी आहे. शेतकऱ्यांनी रेसिड्यू फ्री डाळिंबाचे उत्पादन घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.डॉ. राजीव मराठे, संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.