Chh. Sambhajinagar News : हिमायत बाग फळ संशोधन केंद्रातील केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी १ कोटी ३० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी मंडळाने हा निधी दिला, असल्याची माहिती हिमायतबाग पळसंशोधन केंद्र प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी दिली..सुमारे साडेसात कोटी खर्चून २०१३-१४ मध्ये हिमायतबाग फळ संशोधन केंद्रात केसर आंबा गुणवत्ता केंद्र इंडो इस्राईल प्रकल्प अंतर्गत अस्तित्वात आले. इंडो- इस्राईल प्रकल्पाचे कृषी समन्वयक युरी रुबिन्स्टन आणि प्रकल्प अधिकारी ब्रह्मदेव यांनी सोमवारी (ता. २५) हिमायत बाग फळ संशोधन केंद्रातील केसर आंबा गुणवत्ता केंद्राची पाहणी केली. .Kesar Mango Farming: केसर आंबा बागेत व्यवस्थापनावर भर.फळबाग संशोधन केंद्रातील संरक्षित शेती, विविध अंतरावरील विविध जातीच्या आंबा बागा, त्या भागांची आत्ताची स्थिती, काही पुनरुजीवीत करण्याचा प्रयत्न चालवलेल्या आंबा झाडांची स्थिती, विविध अंतरावरील भागांचे सिंचन, खत तसेच तन व मशागतीचे व्यवस्थापन याची प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर जाऊन सविस्तर माहिती श्री. ब्रह्मदेव यांनी जाणून घेतली. .हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रक्षेत्रावरील एकूणच व्यवस्थापनाच्या बाबी कशा हाताळल्या जातात हे श्री. ब्रह्मदेव यांना सांगितले. या वेळी डॉ. रवींद्र नैनवाड, डॉ. सदाशिव अडकिने, डॉ. विजय सावंत, अनिल बाखळे, डॉ. मनमत तोडकर, सारिका मुंडे आदींची उपस्थिती होती..उत्पादकता वाढीचे उद्दिष्ट ठेवून व्यवस्थापन करा : ब्रह्मदेवआपल्याकडे विज्ञान आणि कौशल्याची कमी नाही. त्यामुळे हिमायत बाग फळ संशोधन केंद्रातील केसर आंबा गुणवत्ता केंद्रात प्रक्षेत्रावरील आंबा बागांमधून उत्पादकता वाढीचे उद्दिष्ट ठेवून भागांचे व्यवस्थापन करा, अशी सूचना इंडो-इस्राईल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी ब्रह्मदेव यांनी केली. .श्री ब्रह्मदेव म्हणाले, की आंब्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी ३० टनांपर्यंत असताना आपल्याकडे १० टन प्रति हेक्टरपेक्षा उत्पादन होत नाही. याचं नेमकं कारण शोधण्याची गरज आहे. जेवढ्या उत्पादनाचे उद्दिष्ट घेऊन आपण खत, सिंचन, अन्नद्रव्य, मशागत व इतर व्यवस्थापन करू तेवढेच उत्पादन आपल्याला मिळेल, असेही श्री. ब्रह्मदेव म्हणाले..Kesar Mango Cultivation : मराठवाडा, विदर्भातील केसर आंबा उत्पादनातील संधीची मांडणी.तांत्रिक आढावा...इंडो- इस्राईल प्रकल्पाचे कृषी समन्वयक युरी रुबिन्स्टन आणि प्रकल्प अधिकारी ब्रह्मदेव यांनी प्रक्षेत्र पाहणीनंतर तांत्रिक आढावा बैठक घेतली. डॉ. संजय पाटील यांनी बैठकीत केसर आंबा गुणवत्ता केंद्राची सविस्तर माहिती सादरीकरणातून दिली. या वेळी युरी रुबिन्स्टन यांनी अलीकडे केंद्रातील बदलाकडे लक्ष वेधत केंद्राच्या प्रक्षेत्रात आमूलाग्र बदल होत असल्याचा दाखला दिला. .खत आणि पाण्याचा परिणामकारक वापर आवश्यक आहे. सर्वोत्तम उत्पादन देणाऱ्या बागांच्या निर्मितीसाठी त्याचे शास्त्र समजून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. आंबा उत्पादकता वाढविणे, नवीन तंत्राचा वापर करणे, तणरोधक मॅट्स वापर वाढविणे, छाटणी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, तंत्रज्ञानातील उणिवांचा शोध घेऊन त्या दूर करणे या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची ठरली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.