Ahilyanagar News : शेती क्षेत्रात पुढारलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्हाही शेतकरी आत्महत्येत मागे नाही. मागील तेवीस वर्षाची माहिती प्रशासनाकडे आहे. तेवीस वर्षात जिल्ह्यात तब्बल १२४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून मरणाला कवटाळले आहे. शासनाच्या पात्रतेनुसार ६३६ शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली असून ५८२ शेतकऱ्यांना मदत नाकारली आहे. .जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्या २०१५ ते २०१७ या तीन वर्षात सर्वाधिक ४०४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि शेती अडचणीत असलेल्या राज्यातील काही भागात शेतकरी कर्जबाजारी, दुष्काळ, शेती तोट्यात जाण्याच्या कारणामुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले जाते. आशिया खंडात पहिल्यांदा सहकाराची महुर्तेमेढ रोवलेल्या आणि सधन, साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याची ओळख आहे. .Marathwada Farmers Death : मराठवाड्यातील ५०१ पैकी २९७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण मदतीसाठी पात्र .मात्र या जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्या कमी नाहीत. जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या माहितीनुसार २००३ पासून जिल्ह्यात आत्महत्या व्हायला सुरवात झाली. २००३, २००४ या वर्षात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्या दोन्ही आत्महत्या सरकारी मदतीनुसार अपात्र ठरल्या. २००५ पासून शेतकरी आत्महत्येची संख्या वाढत गेली..तेवीस वर्षात १२४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्या तरी अलीकडच्या पंधरा वर्षातील आकडा वाढता आहे. २०१५ ते २०१७ या तीन वर्षात सर्वाधिक ४०४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका कृषी अधिकारी, पोलिस निरिक्षक, दुय्यम निबंधकांची समितीत पाहणी व पडताळणी करून कर्जापायी, दुष्काळी स्थिती व अन्य शेतीविषयक कारणाने आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाकडून मदत दिली जाते. .तेवीस वर्षात ६३६ शेतकरी आत्महत्या पात्र ठरवून मदत दिली आहे. ५८२ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरवल्या. २५ प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी आत्महत्या थांबत नाहीत. यंदा आतापर्यंत आठ महिन्यात सुमारे ५२ शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले आहे..Farmer Death : शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढता.व्हिडिओ करून जीवन संपविलेअहिल्यानगर जिल्ह्यात सधन भाग असलेल्या नेवासा तालुक्यातही शेतकरी आत्महत्या होत आहेत. आठ दिवसात या तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे. शेतकऱ्यांच्या वेदना, दुखः कोणी समजून घेत नाहीत, व्यक्तही होता येत नाही. .मात्र अलीकडे सोशल मिडीयाचा वापर वाढला. नेवासा तालुक्यताली वडुले येथील बाबासाहेब सरोदे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. तत्पूर्वी सोशल मिडीयावर व्हिडिओ करून सरकारबद्दल संताप व्यक्त केला. मरण्याआधी सोशल मिडीयावर शेतकरी व्यक्त होत असल्याचे अलीकडच्या काही दिवसापासून दिसत आहे.वर्षनिहाय शेतकरी आत्महत्या२००३ (१), २००४ (१), २००५ (४), २००६ (४१), २००७ (२८), २००९ (१२), २०१० (०७), २०११ (६), २०१२ (१४), २०१३ (२७), २०१४ (४९), २०१५ (११८), २०१६ (१४४), २०१७ (१४०), २०१८ (९०), २०१९ (१२७), २०२० (९१), २०२१ (७१), २०२२ (९७), २०२३ (६०), २०२४ (५०), २०२५ (५२)..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.