Kolhapur News : पेरणीपासून कापणीपर्यंत सोयाबीनमागचे पावसाचे शुक्लकाष्ट थांबायला काय तयार नाही. अगाप पेरणी झालेल्या सोयाबीनची काढणी सुरू असतानाच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसाच्या रिपरिपीने शेतकरी चिंतेत आहेत. .तालुक्यात आतापर्यंत दहा ते बारा टक्के सोयाबीनची काढणी झाल्याचे सांगण्यात आले. सध्या कापणीला आलेला सोयाबीन हवामानाच्या लहरीपणात अडकल्याचे चित्र आहे. शेतीच्या मशागतीपासूनच यंदा शेतकऱ्याला पावसाने दमवले आहे. केवळ सोयाबीनच नव्हे तर भुईमूग व भाताची पेरणीही वेळेत करण्यात पावसाने शेतकऱ्यांना उसंत दिलेली नाही. .Soybean Wilt Disease : सोयाबीन, कपाशी पिकांवर आकस्मिक मर .तालुक्यात उसानंतरचे सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे असते. यंदा १२ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक आहे. मे महिना अखेरीस किंवा जूनमध्ये पेरणी, टोकणणी झालेले आणि माळ भागातील जमिनीत वाफसा आलेले सोयाबीन आता कापणीला आले आहे. पंधरा दिवसांच्या उघडिपीमध्ये दहा ते बारा टक्के सोयाबीनची कापणी झाल्याचा अंदाज असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..Soybean Rate: दर्यापूरमध्ये नव्या सोयाबीनला ३७५० रुपये क्लिंटलला भाव .अलीकडील चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सूर्यदर्शन तसे कमीच आहे. यामुळे सोयाबीन कापणीसाठी शेतकऱ्यांनी गडबड केली नाही. परंतु, बुधवारी (ता. २४) सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. परिणामी, कापणीला आलेले सोयाबीन आता शेतातच ठेवण्याशिवाय पर्याय नाही. .मुळात पेरणीच्या सोयाबीनला जादा पाणी झाले आहे. त्याचे ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता अधिक आहे. सरी वरंबा पद्धतीने टोकणणी केलेले सोयाबीन मात्र चांगले आले आहे. जमिनीत अजून वाफसा आलेला नाही. बहुतांश क्षेत्रातील सोयाबीन कापणीला आले आहे. मिळेल ते उत्पादन पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरी धडपडत आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.