Gadchiroli News: ‘कोया कृषी कुंभ’ महोत्सव या पाचदिवसीय उपक्रमात तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची उलाढाल नोंदविण्यात आली. आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषिपूरक उद्योग आणि स्थानिक उत्पादनांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होत ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली..शेतीत नव्या प्रयोगांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कृषी कुंभमध्ये २०० पेक्षा जास्त स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचतगट, कृषी यंत्रसामग्री उत्पादक, सेंद्रिय शेती समूह, बियाणे व खत कंपन्या तसेच अन्नप्रक्रिया उद्योगांचा समावेश होता. स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला धान, तांदूळ, मध, रानभाज्या, सेंद्रिय भाजीपाला आणि प्रक्रिया केलेले पदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने विक्रीत लक्षणीय वाढ झाली..Nashik Kumbh Mela: नाशिकला पाहिजे वाढीव ६४२ कोटी.महोत्सवात ‘शेती ते बाजारपेठ आणि स्थानिक ते जागतिक’ असा संदेश ठळकपणे पुढे आला. काही शेतकरी गटांनी दर्जेदार तांदूळ व मधाच्या उत्पादनांचे सादरीकरण करत व्यापाऱ्यांशी थेट व्यवहार केले. आधुनिक यंत्रसामग्रीच्या प्रात्यक्षिकांमुळे उत्पादन खर्चात बचत आणि कामाचा वेग कसा वाढविता येतो, याचा प्रत्यक्ष अनुभव शेतकऱ्यांना घेता आला..दररोज आयोजित करण्यात आलेल्या तांत्रिक मार्गदर्शन सत्रांना मोठा प्रतिसाद लाभला. पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, जलसंधारण, कृषी प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म व लघुउद्योग उभारणी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती या माध्यमातून देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसोबत पूरक व्यवसाय सुरू करण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली. नावीन्यपूर्ण शेती प्रयोग, कमी खर्चात अधिक उत्पादन, महिला सहभागातून उभे राहिलेले उपक्रम आणि कृषी प्रक्रियेत यश मिळविणाऱ्या १२ प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान महोत्सवात करण्यात आला. यामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली..कृषिपूरक उद्योगांना चालना‘कोया कृषी कुंभ’ महोत्सवामुळे जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळालीच, शिवाय ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, महिला बचतगटांचे उत्पन्नवाढ आणि कृषिपूरक उद्योगांना चालना मिळाली आहे. १.२० कोटींच्या उलाढालीसह हा महोत्सव गडचिरोलीच्या कृषी विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरला, अशी प्रतिक्रिया सहभागी शेतकरी व उद्योजकांकडून व्यक्त होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.