Pune News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी जोरदार रस्सीखेच चालू आहे. कुलगुरू शोध समितीने शुक्रवारी (ता.७) मुंबईत उमेदवारांच्या प्राथमिक मुलाखती घेतल्या. समितीच्या अध्यक्षपदी तमिळनाडूमधील भारतीयार विद्यापीठाच्या गणित विभागाचे माजी प्रमुख डॉ. कोंडास्वामी आहेत. समिती सदस्य म्हणून भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा व कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच समितीचे समन्वयक अधिकारी डॉ. सरवणन यावेळी उपस्थित होते. .जन्मवर्षाच्या बनावट कागदपत्रांमुळे वादात सापडलेले डॉ. शिर्के यांची प्राथमिक उमेदवारी रद्द होईल, अशी अटकळ काही कृषी शास्त्रज्ञांची होती. ‘डॉ. शिर्कें यांच्याकडे विभागप्रमुख पदाची अर्हता नाही. त्यांची चौकशीदेखील चालू आहे. त्यामुळे त्यांना कुलगुरुपदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरवू नये,’ असे पत्र कृषी शास्त्रज्ञांनी दिले होते..Vice Chancellor Post: कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाद करण्यासाठी चौकशीचे कुभांड .तथापि, डॉ.शिर्के यांना पात्र ठरविण्यात आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून डॉ. शिर्केंसह डॉ सातप्पा खरबडे व डॉ. मिलिंद अहिरे यांच्याही मुलाखती झाल्या. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. धर्मा गोखले व डॉ. भगवान आसेवार, अकोल्यातील डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डॉ. विलास खर्चे, तर दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ.सतीश नारखेडे यांच्याही मुलाखती झाल्या. तसेच, कुलगुरुपदाच्या शर्यतीत परराज्यातील पाच कृषी शास्त्रज्ञही आहेत..Vice Chancellorship Selection: कुलगुरू पदासाठीच्या मुलाखतीला चौकशीच्या भोवऱ्यातील शास्त्रज्ञ.‘‘बारापैकी केवळ पाच कृषी शास्त्रांना अंतिम मुलाखतीसाठी पात्र ठरविण्याची जबाबदारी कुलगुरू शोध समितीची असेल. त्या पाचमधून एका नावाची निवड राज्यपाल देवव्रत आचार्य करतील,’’ अशी माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली..प्राथमिक फेरीत निवडलेले उमेदवारडॉ. विठ्ठल साहेबराव शिर्के, डॉ. भगवान विठ्ठलराव आसेवार, डॉ. ब्लाइस डिसोझा, डॉ. चंद्रमोहन शर्मा, डॉ. धर्मा निवृत्ती गोखले, डॉ.जितेंद्र कुमार, डॉ. सातप्पा भांबर खरबडे, डॉ. मिलिंद चैत्राम अहिरे, डॉ. नचिकेत कोटवलीवाले, डॉ. राकेशचंद्र अग्रवाल, डॉ. सतीश सोपान नारखेडे, डॉ. विलास काशिनाथ खर्चे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.