Hongoli News: वसमत उपविभागात वसमत व औंढा तालुक्यातील पोलिस पाटलांची एकूण २४५ मंजुर पदे आहेत. त्यापैकी ११३ रिक्त पदे आहेत. या रिक्त पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या उपस्थितीत सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृहात गावनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी विविध गावांमधील पोलिस पाटील पदासाठी इच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते. .अनुसूचित जातींसाठी कौडगाव, किनोळा, लांडाळा, अंजनवाडी, खांबाळा, जवळा खुर्द, हिवराजाटू, कोणाथा, लोहरा बुद्रुक, सुकळी, उंडेगाव, करंजी, कंजारा लिंगी ही गावे राखीव आहेत. अनुसूचित जाती महिलांसाठी हयातनगर, गणेशपुर शिंगी, रेऊलगाव, बळेगाव, गोजेगाव ही गावे राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी गवळेवाडी, सारंगवाडी, रामेश्वर, नंदगाव, मुर्तीजापुर सावंगी ही गावे राखीव आहेत..Police Patil Bharati: बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीमधील बिंदूनामावलीचा अडसर दूर.अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी भोसी पिंपरी, वि मा प्रवर्गासाठी आंबा शेंदूरसना, चिंचोली ही गावे, विमा महिला प्रवर्गासाठी भोरीपगाव, भटक्या जमाती ब प्रवर्गासाठी सुकापुर गांगलवाडी अंजनवाडातांडा, भटक्या जमाती ब महिला प्रवर्गासाठी वगरवाडी, भटक्या जमाती क प्रवर्गासाठी औंढा, मोहगाव तुर्क पिंपरी कानोसा, भटक्या जमाती क महिला प्रवर्गासाठी लाख, सावरखेडा, ड प्रवर्गासाठी कामठा, भटक्या जमाती ड महिला प्रवर्गासाठी भगवा ही गावे राखीव आहेत. शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी (शै मा व प्रवर्ग) सातेगाव, परजना, ब्राह्मणगाव खुर्द, औंढा फाटा, धामणगाव, बगडद, पुयनी बुद्रुक, याच प्रवर्गातील महिलांसाठी शहापूर परळी ही गावे राखीव आहेत..Police Patil Protest: पोलिस पाटलांची मोर्चाद्वारे बुधवारी विधिमंडळावर धडक.खुला प्रवर्गवगरवाडीतांडा, वर्ताळा, धार, पळसगाव तर्फे धामणगाव जलालपूर, सुरवाडी, जलालधाबा, वसई, पिंपरी,कुंडकर,कवठा, जांबराजा, रांजोणा, धानोरा काठोडा, खुला प्रवर्ग महिलांसाठी टेंभुरदरा, हिवराखुर्द, मालेगाव, सिद्धेश्वर, दूरचुना, सावळीतांडा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गासाठी तामठी तांडा, मेथा, अजरसोंडा, मुडी, ढेगज, पुर, महाळसगाव रोडगा, याच प्रवर्गातील महिलांसाठी बाभुळगाव पारडीखुर्द अकोली, असे गावांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे..इतर मागास प्रवर्गांना येथे करता येईल अर्जपोलिस पाटील पदासाठी इतर मागास प्रवर्गासाठी खाजमापूर, भेंडेगाव, डोनवाडा, आसेगाव, दिग्रस खुर्द, कागबन, वापटी, धामणगाव, आरळ, पोटा खुर्द, शिरळी, महागाव, माटेगाव, आरळ, तपोवन, बोरीसावंत, पळशी, इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी बोरगाव खुर्द, महमदपुरवाडी, हयातनगर, खांडेगाव वाई, आडगाव, पिंपळा, कोंडशी बुद्रुक ही गावे राखीव आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.