Amravati News: राज्यात नव्याने अपर जिल्हाधिकारी कार्यालये व अपर तहसीलदार कार्यालयांच्या निर्मितीबाबत शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. राज्यात एकूण ११ अपर जिल्हाधिकारी कार्यालये, तर ६९ अपर तहसीलदार कार्यालये प्रस्तावित असून, अस्तित्वात असलेले जिल्हे व तालुक्यांच्या विभाजनासाठी निकष ठरविण्यात आले आहेत..राज्य सरकारने शासकीय कार्यालयातील कामकाजाचा वाढता व्याप, तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, जिल्हा व तालुक्यांचा भौगोलिक व्याप, वाढती लोकसंख्या आदी बाबींमुळे आवश्यकतेनुसार राज्यात नव्याने अपर जिल्हाधिकारी कार्यालय व अपर तहसीलदार कार्यालय निर्मितीबाबत शासनस्तरावर हालचालींना वेग दिला असून, अस्तित्वात असलेले जिल्हे व तालुक्याच्या विभाजनासाठी निकष ठरविण्यात आले आहेत..Jalna Collector Office: जालना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला प्रशासकीय मुद्द्यांचा आढावा.अपर जिल्हाधिकारी कार्यालयासंदर्भात असणाऱ्या निकषांमध्ये प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यांची संख्या, सदरहू कार्यालय निर्मितीच्या अनुषंगाने अपेक्षित लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी-दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या तालुक्यांची संख्या, जिल्हा मुख्यालयापासून प्रस्तावित कार्यालयाचे अंतर, तालुक्यांतील सर्वांत दूरच्या गावांचे सध्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर,.तसेच प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर, जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाची व्याप्ती (सर्व प्रकारची शासकीय वसुली, गौणखनिजे व तदनुषंगिक बाबी, जमाबंदी, जमीन सुधार विधिविधान विषयक कार्यान्वयन (कमाल जमीन धारणा, कुळवहिवाट, आदिवासींना जमीन परत करणे इत्यादी), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व इतर अधिनियम या खालील अपिले व इतर महत्त्वाची कामे) व इतर महत्त्वाची कामे, जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ, तालुक्यांची संख्या आदी निकष विचारात घेण्यात येणार आहेत..Dharashiv Collector Office: शेतरस्त्यांशी संबंधित जीवनरेखा प्रणालीचा गौरव.विभाग जिल्हा प्रस्तावितकोकण ठाणे कल्याणकोकण रत्नागिरी दापोलीपुणे पुणे बारामतीपुणे सातारा फलटणपुणे सोलापूर पंढरपूरनाशिक जळगाव चाळीसगावछ. संभाजीनगर नांदेड किनवटअमरावती अमरावती अचलपूरअमरावती यवतमाळ पुसदअमरावती बुलडाणा खामगावनागपूर नागपूर कळमेश्वर.प्रशासकीय येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात व नागरिकांना सोईचे व्हावे, यासाठी शासनाने नव्याने अपर जिल्हाधिकारी कार्यालय व अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अचलपूर येथे अपर जिल्हा कार्यालय देण्याची मागणी महसूल मंत्र्यांकडे केली होती. त्याबाबत पाठपुरावा सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय होईल.प्रवीण तायडे, आमदार, अचलपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.