Melghat Child Deaths : धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यांत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत १०७ बालमृत्यू व चार मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मागील अनेक वर्षांपासून मेळघाटात बालमृत्यू व मातामृत्यू सुरूच आहेत. राज्य व केंद्र शासनामार्फत दर वर्षी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात, परंतु त्यानंतरही येथील मृत्यूचे सत्र थांबलेले नाही..आरोग्यावर मेळघाटात मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो, परंतु त्याचा फायदा येथील आदिवासी बांधवांना होत नसल्याची स्थिती आहे. चिखलदरा व धारणी मिळून ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालये, तसेच अनेक ठिकाणी उपकेंद्रे आहेत..Orphan Child Welfare : निराधार बालकांसाठी धावून आले शेतकरी पुत्र.परंतु, मेळघाटातील बालमृत्यू व मातामृत्यू थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. एक एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ अखेरपर्यंत १०७ बालमृत्यू व चार माता मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हे मृत्यूचे तांडव कधी संपणार, असा नागरिकांचा सवाल आहे..Child Mortality : मेळघाटात पाच वर्षांत १०६४ बालमृत्यू .स्थलांतराने समस्या गंभीरमेळघाटात रोजगार उपलब्ध व्हावा, येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, दळणवळणाच्या सुविधा मिळाव्यात, चाळीस गावांमध्ये वीज मिळावी, रस्त्यांचा प्रश्न सुटावा, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान सुधारेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होतआहे..मागच्या वर्षीच्या तुलनेत काही प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. अशा ठिकाणी कोर्टाच्या आदेशानुसार बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ देण्यात यावेत. तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी देण्यात आले, तर मेळघाटात आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा देणे सोईचे होईल.बंड्या साने, खोज संस्था.मेळघाटात बालविवाहांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कमी वयात लग्न होतात. बालमृत्यू व माता मृत्यूंचे हे मुख्य कारण आहे. ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून चार नवीन मंजूर झालेले आहेत. एप्रिलपासून १०७ बालमृत्यू व चार मातामृत्यू झाले आहेत.डॉ. सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.