Solapur News : कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीला आधुनिकतेचा नवा आयाम देण्यासाठी शासनाच्या वतीने मोठा उपक्रम राबविण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले असून, केगाव (ता. उत्तर सोलापूर) येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते १०१ ट्रॅक्टर शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आले..या वितरण उपक्रमात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व ट्रॅक्टर वितरक उपस्थित होते..Farm Mechanization Scheme: यांत्रिकीकरणासाठी सोडत निघाली; शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली.श्री. भरणे यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ट्रॅक्टरच्या चाव्या देऊन कृषी यांत्रिकीकरणाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली असल्याचे मत व्यक्त करताना ते म्हणाले, की कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर निधीच्या आधारे ‘प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देण्यात येत आहे..Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची खीळ काढा.राज्यभरातील १,९६,०५० लाभार्थ्यांची यंदा निवड झाली आहे. त्यापैकी १,८९,७५३ अर्ज प्रक्रियेत आहेत, तर ८,२५१ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. सध्या ५५६ लाभार्थ्यांच्या खात्यात ७११ लाख रुपयांचे अनुदान थेट वर्ग करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले..‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान महत्त्वाचे’‘‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले जाणार नाही. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देऊन शेती प्रक्रिया सुलभ करणे, मजुरांची टंचाई कमी करणे आणि वेळेची बचत साधणे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले, म्हणजे आमचे प्रयत्न यशस्वी ठरले,’’ असेही श्री. भरणे या वेळी म्हणाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.