Sangli News: सांगली जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणी आटोपली आहे. रब्बीची १ लाख ९१ हजार ९७३ हेक्टर म्हणजे ९८.८ टक्के पेरणी झाली आहे. मका पिकाची सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली असल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचली असल्याचे कृषी विभागाने सांगितले..जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९४ हजार ३९३ हेक्टर असून ज्वारीचे सरासरी १ लाख २६ हजार २८ हेक्टर क्षेत्र आहे. ज्वारीच्या एकूण सरासरी क्षेत्रापैकी जत तालुक्याचे ६५ हजार ४२९ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यातील जत, मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ या चार तालुक्यांत रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक पेरा ज्वारीचा झाला आहे. उर्वरित तालुक्यांतही २२०० ते ६००० हेक्टरपर्यंत ज्वारी पेरणी झाली आहे..Rabi Sowing : बुलडाणा जिल्ह्यात रब्बी पेरणी १०० टक्के .जिल्ह्यात पशुधनाची संख्या अधिक असल्याने पशुपालक चारा म्हणून मका पिकाची लागवड करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे सर्वच तालुक्यात मका पिकाची पेरणी सर्वाधिक झाली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र २२ हजार ६५८ हेक्टर असून २९ हजार ८९५ हेक्टरवर म्हणजे १३१ टक्के पेरा झाला आहे. मका पिकाबरोबर हरभरा आणि गहू पिकाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ६३ हजार ७४ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत सुरू हंगामातील उसाची लागवड सुरू आहे..Rabi Sowing: बुलडाण्यात रब्बी पिकांची पेरणी १०० टक्क्यांवर.तालुकानिहाय रब्बी हंगामातील पेरणी दृष्टीक्षेपतालुका क्षेत्र (हेक्टरमध्ये)मिरज २४०८०जत ८१६२१खानापूर ७७४३वाळवा ११२८९तासगाव ९२४९.शिराळा ४२९६आटपाडी २०८८१कवठेमहांकाळ १९५९१पलूस ४०७८कडेगाव ९०४०एकूण १९१९७३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.