Gadchiroli News : कुत्रिम टंचाईआड निविष्ठांची जादा दराने विक्री करण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रधारकांविरोधात कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला. त्याअंतर्गत दहा कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द तर २२ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी संजय मेश्राम यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. .तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड सीमेशी संलग्न असलेल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात खतांचा काळा बाजार वाढीस लागला आहे. लगतच्या जिल्ह्यात खताची वाढीव दराने विक्री होते. त्यातूनच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. खत तुटवड्यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची झाडाझडती घेण्यात आली..Overprized Fertilizer : जास्त दराने खते, बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक करा .त्यानुसार, अनियमितता आढळलेल्या कृषी केंद्रधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर बुधवारी (ता. १०) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या दालनात सुनावणी झाली. या वेळी शेतकऱ्यांना जादा दराने खताची विक्री करणे, साठा असतानाही खत न देणे, बोगस बियाणे व खते बाळगत शेतकऱ्यांची फसवणूक करणे अशाप्रकारच्या अनागोंदी सिद्ध झाल्या. .त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी १० कृषी केंद्राचे परवाने रद्द केले. त्याबरोबरच २२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने १५ दिवस ते एक महिना कालावधीकरिता निलंबित करण्यात आले. सुनावणी दरम्यान समाधानकारक उत्तर न देणाऱ्या चार खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले. कुरखेडातील तीन कीटकनाशक तसेच तीन बियाणे याप्रमाणे सहा परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. पाच कृषी केंद्र संचालकांना सक्त ताकीद देण्यात आली..जास्त दराने विक्रीकृषी विभागाच्या तपासणी मोहिमेत जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रधारकांनी जास्त दराने खत, कीटकनाशके विक्री केल्याचे आढळून आले. यात चामोर्शी तालुक्यातील २, कुरखेडा पाच, आरमोरी पाच व सिरोंचा तालुक्यातील तीन कृषी केंद्रांचा समावेश आहे..Fertilizer Overpricing : खतांची चढ्या दराने विक्री भोवली.या कृषी केंद्रांवर झाली कारवाईअंकित (वैरागड, आरमोरी), अंकिता (गुरनोली, कुरखेडा), बमनोड (गोठणगाव, कुरखेडा), दिनेश (रामगड, कुरखेडा), देशमाता फार्मर प्रोड्युसर कंपनी (कुरखेडा), कुंडू (नेताजीनगर, चामोर्शी), महालक्ष्मी (अन्कीसा, सिरोंचा), गजानन (रंग्यापल्ली, सिरोंचा), ज्योती (मोयबीनपेठा, सिरोंचा), अन्नदाता (डोंगरगाव, आरमोरी), अतुल (डोंगरगाव), आनंद (देलनवाडी, आरमोरी), सी. डी. गांधी फर्टिलायझर डिविजन (चामोर्शी), काजल (बेन्गलखेडा, कुरखेडा), साईनाथ (जाफराबाद), लक्ष्मीनारायण (जाफराबाद), महंत (गीलगाव), मीनकुसरे (कुरखेडा), भूमेश्वर (जोगीमाखरा, आरमोरी), शिव (वडसा), कन्हैय्या (कडोली, कुरखेडा) यांचे परवाने निलंबित करण्यात आले. धाबेकर (कुरखेडा), हटवार (कुरखेडा), तिरुपती (अन्कीसा, सिरोंचा), नरेंद्र (पळसगड, आरमोरी) या रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्याबरोबरच एम.बी.बी.एस. (कुरखेडा), प्रशांत (खरपुंडी, गडचिरोली), किसान (येनापूर, चामोर्शी), प्रदीप (तळेगाव, कुरखेडा), गीतेश्वर (कुरखेडा) या केंद्रधारकांना ताकीद िदली..खतासह तसेच इतरही निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार करणाऱ्या कृषी सेवा केंद्रधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याआधारे काही कृषी केंद्रधारकांवर परवाना रद्द तर काहींवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.- प्रीती हिरळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.