Mahesh Gaikwad
डुक्कर हा प्राणी तर सर्वांनीच पाहिला असेल. पण डुकराला पाहून अनेकांना त्याची किळस येते.
अनेक प्राणीप्रेमींना विविध प्राणी आवडतात. परंतु खूर कमी लोक असे असतील ज्यांचा डुक्कर हा आवडता प्राणी असेल.
डुकराची किळस वाटण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा प्राणी नेहमी चिखलात लोळताना दिसतो. पण डुक्कर चिखलात का लोळतात याबद्दल अनेकांना माहित नसेल.
डुक्कर चिखलात राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे चिखलात असणारा थंडावा. आता चिखलातील थंडावा आणि त्यात डुकरांच्या लोळण्याचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
डुकरांमध्ये घाम उस्तर्जित करणाऱ्या ग्रंथी नसतात. त्यामुळे डुक्कर चिखलात राहणे पसंत करतात.
ज्याप्रमाणे सर्व सजीव प्राण्यांना गरमी लागते, तशीच डुकरांनाही गरमी लागते. मात्र, डुकरांचा घाम शरिराबाहेर पडत नाही.
त्यामुळे शरिराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी डुक्कर तासंतास चिखलात लोळताना दिसतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.