Orange market: नागपुरी संत्र्याला का आहे मागणी?

Ganesh Kore

सध्याच्या हंगामात बाजारात विविध फळांची रेलचेल पाहण्यास मिळते. यापैकी मुख्य फळ म्हणजे संत्रा.

Eating Orange | agrowon

ऑक्टोबर- नोव्हेंबरपासून पुणे-गुलटेकडी बाजार समितीत दररोज दोन ते तीन ट्रक या प्रमाणात संत्र्यांची आवक सुरू होते.

Eating Orange | agrowon

प्रति गाडीत ४०० पेट्या या दराने ही आवक बाराशे पेट्यांची असते. डिसेंबरअखेरपर्यंत आवकेत सातत्य राहते.

Eating Orange | agrowon

छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे सचिव आणि नागपूर संत्र्यांचे प्रमुख अडतदार करण जाधव म्हणाले, की सुरुवातीच्या आवेकत हिरव्या रंगाच्या आणि आंबट संत्र्यांची आवक असते.

Eating Orange | agrowon

त्यास मागणी आणि दरही कमी असतो. त्यांचा पुरवठा पश्‍चिम बंगाल, चंडीगडसह दक्षिण भारतात होतो.

Eating Orange | agrowon

यंदाचे चित्र सांगायचे, तर ऐन काढणीच्या हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने संत्रा बागांचे नुकसान झाले. माशीचा डंख बसल्याने पेटीतील काही संत्र्यांना पाणी सुटले. अशावेळी दर्जेदार फळांना चांगली मागणी राहून त्यांचा दर दीड हजार रुपये प्रति पेटी राहिला.

Eating Orange | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farm | agrowon