Swarali Pawar
जनावरे चुकून किंवा कमतरतेमुळे पचू न शकणाऱ्या वस्तू खातात. या वस्तू पोटात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात.
खिळे, तारा, सुई, पिन, स्क्रू यांसारख्या वस्तू धोकादायक असतात. या वस्तू पोटाला आणि छातीला गंभीर इजा करू शकतात.
प्लास्टिक पिशव्या, पॉलिथिन, कापड, दोर आणि रबर जनावरे खातात. या वस्तूंमुळे पचनसंस्थेवर मोठा परिणाम होतो.
दगड, वाळू, माती, काच, हाडे आणि सिमेंटचे अवशेष घातक ठरतात. अशा वस्तूंमुळे पोट फुगणे व वेदना वाढतात.
आहारात स्फुरदाची कमतरता असल्यास जनावरे वेगवेगळ्या वस्तू खातात. संतुलित आहार न मिळाल्याने ही सवय वाढते.
रस्त्याच्या कडेला चरणे किंवा बांधकामाजवळ जनावरे सोडणे धोकादायक आहे. गोठा व चारा साठवण जागेत अस्वच्छता असल्यास धोका वाढतो.
दीर्घकाळ उपाशी किंवा बांधून ठेवलेली जनावरे काहीही खाऊ शकतात. हालचालीचा अभावही अखाद्य वस्तू खाण्यास कारणीभूत ठरतो.
जनावरांना संतुलित आहार व खनिज पूरक द्यावेत. गोठा, कुरण आणि चारा स्वच्छ ठेवल्यास ही समस्या टाळता येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.