sandeep Shirguppe
आपल्या सर्वांना पळस ही वनस्पती परिचित माहिती असेल तीन दलांची पाने हे या वनस्पतीचे खास वैशिष्ट्य आहे.
पळसाची फुले औषधी म्हणूनही गुणकारी असतात. या वनस्पतीच्या खोडाची साल, फुले, पाने औषध म्हणून उत्तम कार्य करतात.
उष्णता वाढली की आपल्या शरिराला उन्हाळे लागतात अशावेळी पळसाची फुले वाळवून त्याचे चूर्ण करावे. हे चूर्ण दूध व खडीसाखरेसह घ्यावे.
अंगात कडकी भरणे, हातापायांची आग होणे यासाठी रात्री पळसाची फुले ग्लासभर पाण्यात भिजवून पाण्यात सकाळी साखर घालून पिल्यास आराम मिळतो.
महिलांमध्ये मासिक स्राव अधिक असेल तर पळसाच्या फुलांचे चूर्ण इतर औषधांसह वापरावे. किंवा फुले पाण्यात भिजत घालून ते पाणी प्यावे.
सूज, गळू यावर पळसाची पाने बांधावीत. पण पोटात औषधे मात्र जरूर घ्यावीत.
पळस औषधी वनस्पती आहे. पण या उपचारांच्या जोडीला पथ्य पालन करणे जरुरी आहे.
डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचार मोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो.