Mahesh Gaikwad
भारतासह जगभरात अनेक लोक आजघडीला डायबिटीजच्या आजारामुळे त्रस्त आहेत.
डायबिटीज म्हणजेच मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांना गोड पदार्थ खाणे वर्ज्य असते. त्यामुळे अशा लोकांना खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते.
मधुमेहाच्या रूग्णांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात. तसेच दैनंदिन आहार घेताना विशेष काळजी घ्यावी लागते.
गोड पदार्थ वर्ज्य असल्यामुळे ते खाता येत नाहीत. पण आज आपण अशा काही मिठाईचे प्रकारांची माहिती पाहणार आहोत, जे मधुमेहाचे रूग्णही खाऊ शकतात.
मधुमेहाचा त्रास असणारे रूग्ण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेली बर्फी खाऊ शकतात.
आरोग्यादायी मिठाईमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सपासून बनवलेली बर्फी मधुमेहाच्या रूग्णांसाठी बेस्ट ऑप्शन आहे.
याशिवाय डार्क चॉकलेट मधुमेहाच्या रूग्णांसाठी गोड पदार्थाचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये साखरेचा घटक कमी प्रमाणात असतो.
वरील मिठाईचे पदार्थ मधुमेहाचे रूग्ण खाऊ शकत जरी असले, तरी ते ठराविक प्रमाणात खाल्ले पाहिजेत. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.