Mahesh Gaikwad
आजकाल चेहऱ्याच्या सौंदर्याप्रति सर्वचजण जागरूक झाल्याचे पाहायला मिळते. प्रत्येकाला सुंदर आणि मुलायम त्वचा हवी आहे.
चेहरा सुंदर दिसावा यासाठी अनेक महागडी सौंदर्य प्रसाधने बाजारात उपलब्ध आहेत. पण चेहऱ्यावरी ब्लॅक हेड्स काही केल्या कमी होत नाही.
नाकाचा शेंडा, हनुवटी किंवा कपाळाजवळच्या भागात ब्लॅक हेड्स आढळतात. त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण, बॅक्टेरिया किंवा अतिरिक्त तेल साचल्यामुळे ही समस्या उद्भवते.
चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्ससाठी बाजारात विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. पण तुम्ही घरच्या घरी कमी खर्चामध्ये सोपा उपाय करून या समस्येपासून सुटका मिळवू शकाता.
सर्व प्रथम चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या. वाफ घेण्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे उघतात आणि ब्लॅकहेड्स काढणे सोपे होते.
वाफ घेतल्यानंतर मध, साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून ब्लॅक हेड्स असलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावा. सुकल्यानंतर थोड्यावेळाने बोटाने घासून हा लेप काढा.
यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स बऱ्याच प्रमाणाक कमी होतील आणि याचे साईड इफेक्टही होत नाही. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.