Aslam Abdul Shanedivan
राज्यातील सहकारी दूध संघांना गाईचे दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळणार आहे.
याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला असून अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली.
हिवाळी अधिवेशनात दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बाबत घोषणा केली होती.
या अनुदानासाठी अंदाजे १३५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याची अंलमबजावणी १ जानेवारी ते २९ फेब्रुवारीदरम्यान लागू करण्यात आली.
राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये प्रति लिटर अनुदान दिले जाणार आहे.
जे शेतकरी खासगी दूध संघांना दूध घालतात याचा लाभ हवा असेल तर त्यांना सहकारी दूध संघांना दूध घालावे लागेल. तसेच सहकारी दूध संघांना ते स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे.
केवळ सहकारी दूध संघांना दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी दूध संघांना अनुदान नाही
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.